१४ हजाराची लाच घेताना पाटबंधारे विभागातील लिपीक जाळ्यात

राज्यासह जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच आणखी एक सरकारी बाबू जाळ्यात अडकला आहे. पाटबंधारे विभागातील एका लिपीकला १४ हजार रुपयाची लाच घेताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तुषार अशोक पाटील असे लाचखोराचे नाव असून याबाबत पुढील कारवाई सुरु आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत गाळ देण्यात येते. परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर १२०० रूपये प्रमाणे ११ जणांकडून १४ हजार ४०० रुपये मागणी होत असल्याची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यावर सदर पथकाने आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सापळा रचून पाटबंधारे विभागातील लिपिक तुषार अशोक पाटील याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान सदर कार्यवाही एसीबीच्या (धुळे) पथकाने केली असून या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments