हातभट्टी दारुच्या विरोधात निळे निशाण सामाजिक संघटना घेणार आक्रमक भुमिका हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पाठवुन कठोर कारवाई करावी.

दि .१ जानेवारी २०२४ पासुन हातभट्टीच्या दारुच्या विरोधात निळे निशाण सामाजिक संघटना घेणार आक्रमक भुमिका जिल्ह्यात विशेषता रावेर यावल जामनेर बोदवड तालुक्यात हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यांनि धुमाकुळ घातलेला आहे.
 त्यामुळे अनेकांच्या जिविताची व संसाराची राखरांगोळी झालेली आहे आणि भविष्य आणि वर्तमान काळातही हातभट्टी दारु समाजाला घातक ठरणार आहे.
 त्यामुळे हातभट्टीची दारु तयार करणारे तसेच विक्री करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पाठवुन कठोर कारवाई करावी असे निवेदन उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक जळगांव यांना निळे निशाण सामाजिक संघटनेच्या जळगांव जिल्हा प्रमुख चारुलता सोनवणे व जिल्हा सचिव वैशाली हेरोळे यांनि दिले निवेदन 

0/Post a Comment/Comments