यावल येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाणात वाढताना दिसत असून यातच आणखी एका अपघाताची घटना समोर आली आहे. यावल शहरातील यावल -फैजपूर रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर दुचाकीला कारने मागून धडक दिल्याने 45 वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सैय्यद खलील सैय्यद हमीद कुरेशी (45, रा.डांगपूरा, मन्यारवाडा, यावल) असे अपघातातील मृताचे नाव असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला.

नेमकी घटना काय?
यावल शहराच्या बाहेर जातांना कॉलेज नजीक पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सायंकाळी दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.वाय. 8205) वर सैय्यद खलील सैय्यद हमीद कुरेशी (45, रा.डांगपूरा, मन्यारवाडा, यावल) हे फैजपूरकडे जात असताना त्यांच्यामागून कार (क्रमांक एम.एच.04 डी.एन.2627) घेऊन मोहसीन खान मुक्तार खान (यावल) हा भरधाव वेगाने जात असताना मागूनच त्याने दुचाकीला जबर धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार दुचाकीवरून फुटबॉलसारखा हवेत उडाला व कारवर कोसळला. यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. घटनास्थळावरून त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व नंतर तेथून पुढील उपचाराकरीता जळगाव हलवण्यात आले. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. याबाबत रात्री उशीरा याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अपघाताच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त वाहन यावल पोलिसांनी ताब्यात घेतले.

0/Post a Comment/Comments