सांगवी खु॥ गावात सन २०२१ / २३ मध्ये झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी तसेच नमुद केलेल्या विषयांची चौकशी करण्यात यावी.
१) समाज मंदिर रिकामे करून दलीत वस्तीच्या ताब्यात देणे बाबत
२) ग्राम पंचायत मध्ये सफाई कामगार नियुक्त करण्याचे आदेश देणे बाबत .
३) सन २०२१ / २३ दलीत वस्ती मध्ये चौदाव्या वित्त व पंधराव्या वित्त आयोगातून कोणती विकास कामे करण्यात आली तसेच सन २०२० ते २०२३ या वर्षात ग्रामनिधी च्या मध्यमातून दलित वस्ती मध्ये कोणते विकास कामे करण्यात आली याची चौकशी करून संबधितावर कारवाई करण्यात यावी .
४) दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत गेल्या ५ वर्षात कोणती विकास कामे करण्यात आली याची चौकशी करू करण्यात यावी .
५) जि. प.मराठी शाळा सांगवी खु॥ मुख्याध्यापक यांचे सन २०२१ / २३ या वर्षा पर्यंत वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा ग्राम पंचायत ने कुठलाही खर्च केलेला नाही याची चौकशी बाबत .
६) सन २०२१ / २३ मध्ये अंगणवाडी या ठिकाणी दप्तर, टेबल ,खुर्ची, व लहान मुलांचे खेळणी,बालसाहित्य कुठलाही खर्च केलेला नाही याची चौकशी बाबत
७) अंगणवाडी सांगवी खु॥ ता.यावल जि.जळगाव सन २०२१/२२ कोड नं . २७४९९२१०११९ या ठिकाणी नवीन अंगणवाडी बांधकाम झालेले असून निस्कृष्ट दर्जाचे काम करण्यात आलेले असून आज पर्यंत अंगणवाडी सेविकांनी ताब्यात घेतलेले नाही त्याची चौकशी होणे बाबत .
८) दलीत वस्ती मध्ये कुठल्याही प्रकारचे घरकुल योजना मिळालेल्या नसुन घरकुल मंजूर झाल्यास ग्रामसेवक व सरपंच यांचे पती हे सहा ते सात हजार रुपयाची मागणी करीत असतात तसेच ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक सतत गैरहजर असल्याने ग्रामस्थांना कागदपत्र साठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात. या प्रकरणाची चौकशी होऊन
या मुद्द्यांवर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या करिता निळे निशाण सामाजिक संघटने च्या वतीने म. गटविकास अधिकारी सो .यावल ता.यावल यांना निवेदन देण्यात आले.
त्या प्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा महिला प्रमुख चारुलताताई सोनवणे,जिल्हा महिला सचिव वैशाली ताई हेरोळे,यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे,यावल तालुका युवक अध्यक्ष इकबाल तडवी,यावल तालुका संपर्क प्रमुख दीपक मेढे, यावल तालुका महासचिव आबिद कुरेशी,तसेच सांगवी खुर्द येथील अशोक तायडे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा