सांगवी खुर्द गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या निळे निशाण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी तर सरपंच यांना विचारणा केली असता त्यांना कुठली ही माहिती नाही.

सांगवी खुर्द गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या निळे निशाण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी तर सरपंच यांना विचारणा केली असता त्यांना कुठली ही माहिती नाही.
यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे ग्रामपंचायत चा मनमानी कारभार सरपंच महिला त्यांचे पती सांभाळतात ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक असतात गैरहजर दहा पंधरा दिवसातून एक दिवस येतात ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये व अर्धा एक तास थांबतात व कुठलेही कागद पत्र ग्रामपंचायत मधील गावकऱ्यांना हवे असल्यास त्यांना वेळेवर मिळत नाही व दहा पंधरा दिवस त्यांना वाट बघावी लागते. व दलीतवस्ती मधील मागील दहा वर्षात ग्रामनिधी देण्यात आला नाही.
 व तसेच दलीत वस्ती सुधार योजना साठी कुठला ही निधी खर्च करण्यात आला नाही. अंगणवाडी साठी टेबल खुर्ची च नाही तसेच ग्रामपंचायत कडून अंगणवाडी साठी निधी खर्च करण्यात आला नाही. सन २०२१/२२ मध्ये बांधण्यात आलेली अंगणवाडी हे निस्कृष्ट दर्ज्याचे काम दिसून येत आहे.
 अंगणवाडी च्या भिंती ला भेगा पडल्या ने दिसून येत आहे तसेच अंगणवाडी पावसाळ्यात गळत असते.ग्रामपंचायत शेजारी अनेक वर्षा पासून समाज मंदिर आहे तरी त्या समाज मंदिरा मध्ये सफाई कामगार सरपंच यांचे पती यांनी समाज मंदिरात राहण्यास परवानगी दिली. तसेच जि.प.शाळा सांगवी खुर्द ता.यावल
  १) शाळेकरिता कमोड शौचालय दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करून देणे.
२)शाळेच्या रंग कामाकरीता रंग उपलब्ध करून देणे (बाला पेंटिंग)
३)इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे .
४)संगणक उपलब्ध करून देणे.
५)शाळेत मुख्यध्यापक कार्यालय करिता तसेच शालेय ग्रंथालय कपाट, खुर्च्या ,फळा ,वर्ग खोली चित्र काम व रंग काम अशा मागण्या जि.प.सांगवी खुर्द ता.यावल यांनी सांगवी खुर्द ग्रामपंचायत ला दि.०४/०९/२०२१तसेच दि.२०/१०/२०२१ , दि.१७/०१/२०२२,दि.२६/११/२०२२, दि.३१/१०/२०२३ असे वारंवार अर्ज देऊन मागण्या करून सुद्धा आज पर्यंत त्यांना काहीही सुविधा उपलब्ध झाल्या नाही.
अशा अनेक समस्या नागरिकांनी निळे निशाण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

0/Post a Comment/Comments