जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

जळगाव;राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. जळगावमधून एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये चाळीसगावच्या मेहुणबारे येथील गिरणा नदीच्या पुलावरून एक खाजगी बस खाली कोसळली आहे.

ही बस अहमदाबादवरून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाले आहेत.

या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

0/Post a Comment/Comments