दि .३१/१०/२०२३ रोजी पत्रकार भवन जळगाव येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून शासन प्रशासनाचे लक्ष वेधून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार परिषदेत उपस्थीत केलेले विषय खालील प्रमाणे
जळगांव जिल्ह्यातिल समाज कल्याण विभाग , आदिवासी विकास प्रकल्प यावल , जिल्हापरिषद विभागा मार्फत सुरु असलेल्या शाळा , आश्रम शाळा , आदिवासी व मागासवर्गीय मुल मुलिंचे वस्तीगृह तसेच जिल्ह्यातिल काही सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार यांचे मार्फत गोरगरिबांची फसवणुक सन २०१३ मध्ये झालेले अन्न सुरक्षा योजनेचं सर्वेक्षणात अनेक गोरगरीब गरजुंना डावलून धनदांडग्यांचा समावेश , बेघर भुमीहीन अतिक्रमण धारक यांचेवर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले की १ ) जिल्ह्यातिल अनेक आश्रम शाळा मागासवर्गीय मुल मुलींचे वस्तीगृह या ठीकाणि विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुखसुविधा उपलब्ध होत नसुन वस्तीगृहातिल अधिक्षक सह संबंधित मंडळी विद्यार्थ्यांचे शोषण करित आहे त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी .
२ ) अनेक आश्रम शाळेत अनुसुचित जाती / जमाति , भटक्या विमुक्ती जातिच्या विध्यार्थिनी या सुरक्षीत नाही काही आश्रम शाळेत मोठ्या प्रमाणात १२ ते १३ वर्षाच्या मुली शिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी अधिक्षक , गृहपाल , मुख्याध्यापक ह्या महीला असणे गरजेचे आहे परंतु अधिकाऱ्यांच्या निष्काळजी व दुर्लक्ष असल्यामुळे काही आश्रमशाळेत पुरुष कार्यरत असुन अनेक ठिकाणी मुली सोबत अश्लील प्रकार घडले आहे अनेक मुलींचे आयुष्य उध्वस्त झालेले आहे भविष्यात यापुढे असे प्रकार घडु नये यासाठी आश्रमशाळा निवासी महीला अधिकारी असणे सक्तीचे करण्यात यावे .
३ ) सन २०१३ मध्ये अन्न सुरक्षा योजनेचे सर्वेक्षण होत असतांना महसुल कर्मचारी यांचा संप असल्यामुळे धान्य दुकानदार यांनी सर्वेक्षणाची जबाबदारी घेऊन मोठ्या प्रमाणात आपले मर्जीतील व संबंधीत व्यक्तीचे नांव अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत समाविष्ट करून घेतले त्यामुळे अनेक गोर गरीब या योजने पासून वंचीत राहीले म्हणून स्थानिक पातळीवर चौकशी करून ज्या धनदांड्यांचे नांव यादित असेल ते नांव कमी करून गरजु व्यक्तींना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून स्वस्त धान्य देण्यात यावे . ४ ) अनेक स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांना पावती देत नाही तसेच काही दुकानदार ग्राहकांचे थम घेऊन घेतात परंतु धान्य वितरित करीत नाही त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी . ५ ) अनेक वर्षापासुन जे लोक ज्या जागेवर अतिक्रमण करून रहात असतिल त्यांना त्याच जागेवर घरकुले योजनेचा लाभ देण्यात यावा . ६ ) गांव पातळीवर दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत झालेल्या विकास कामांची चौकशी करण्यात यावी . ७ ) दुर्गम अतिदुर्गम भागातील जि . प . शाळेतील अनेक शिक्षक शासनाची दिशाभुल करून तसेच अनु . जाति /अनु . जमातिच्या विद्यार्थीना शिक्षणा पासुन वंचीत ठेऊन शाळेत न जाता शासनाची फसवणूक करून पगार घेत आहे त्यांचेवर कारवाई करण्यात यावी . ८ ) संजय गांधी निराधार योजना व कुटुंब अर्थ सहाय्य योजना यांच्यातिल जाचक अटी रद्द करण्यात याव्या . ९ ) खाजगी क्षेत्रातील शैक्षणिक संस्था चालक यांनी मनमानी कारभार करून सर्व सामान्य माणसाची शैक्षणिक व प्रवेश फि च्या नावांने अर्थिक लुट शुरू केलेली आहे ति अर्थिक लुट थांबविण्यात यावी . १० ) शासकिय रुग्णालयामध्ये रुग्णांना रेफर करण्याच्या नांवाने वेळकाढून रुग्णांना वाऱ्यावर सोडण्याचे काम काही डॉक्टर करित आहे त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत याचीही चौकशी करण्यात यावी .
११ ) भुसावळ औष्णीक विद्युत केंद्र दिपनगर येथे ठेकेदारांच्या मनमानी व स्वार्थीपणामुळे मजुरा करिता केलेल्या कायद्याची पायमल्ली होत असुन मजुरीच्या नांवाने मजुरांचे शोषण होत आहे त्याची चौकाशी करण्यात यावी . अशी शासन प्रशासनाकडे मागणी केली.
त्याप्रसंगी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा चारुलता सोनवणे , जिल्हा सचिव वैशाली हेरोळे , जिल्हा उपाध्यक्ष नंदा भावटे , जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम , अमळनेर विभाग प्रमुख दिवानजी सांळुखे , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , चोपडा तालुका अध्यक्षा अनिता बाविस्कर , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर , यावल तालुका युवक अध्यक्ष इकबाल तडवी , चोपडा शहर अध्यक्षा बबिता बाविस्कर उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा