निळे निशाण सामाजिक संघटनेची जळगाव जिल्हा बैठकीत पदाधिकाऱ्यांवर सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता जबाबदारी निच्छित करण्यात आली .
दि .०७/१०/२०२३ शनिवारी रोजी पद्मालय विश्राम गृह जळगाव येथे संघटनेचे संस्थापक / आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थित जिल्हा बैठक घेण्यात आली.
बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांनी पदाधिकारी याना पदाच्या जबाबदाऱ्या समजून सांगितल्या तसेच ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी मा. कांशीराम जी यांची स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा संपुर्ण जिल्हाभरात घेण्याचे आदेश जळगाव जिल्हा अध्यक्षा यांनी दिले व जिल्हातिल गोरगरिब जनेतेच्या समस्या , बेघर भुमिहिन अतिक्रमण धारक यांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे तसेच बेघर भुमिहिन व्यक्ती अतिक्रमण करून राहत असलेल्या जागेवरच त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा .जिल्हा परिषद शाळेच्या खाजगी करणा विषय शासनाने घेतलेला निर्णय रदद करण्यात यावा, संपुर्ण जिल्ह्यात ग्रामिण भागातिल प्राथमिक आरोग्य केंद्र सुरळीत कार्यान्वीत करणे . सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार यांनि ग्राहकांना धान्याची पावती देणे सक्तीचे करणे . अल्पवयीन मुलींच्या मिसींग तक्रारीची पोलीसांनी तात्काळ दखल घेऊन त्यांना पुस लाऊन घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्या यावा. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यात यावा, केळी कामगार - शेतमजुर यांच्या सुरक्षेची तसेच त्यांचा अपघात झाल्यास औषधोपचार सह कुटुंब निर्वाहाची जबाबदारी निश्चीत करण्यात यावी . अश्या अनेक समस्या कार्यकर्त्यांनी जाणून त्या समस्या सोडवण्याच्या उपायोजना कराव्या असे अनेक प्रश्न मार्गी लावावेत या बैठकीला जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा श्रीमति. चारुलताताई सोनवणे , जिल्हा उपाध्यक्ष श्रीमति. नंदाताई भावटे , जिल्हा सचिव सौ . वैशालीताई हेरोळे , जळगाव जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम , जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , भुसावळ विभागीय प्रमुख महेंद्र गायकवाड , अमळनेर विभागीय प्रमुख दिवानजी साळुंखे , आश्विनी अटकाळे , गिता वाघ , लक्ष्मी मेढे , अनिता बाविस्कर , बबिता बाविस्कर , पिंकी सुतार , सोनी जैन , कविता शिंदे , विजय धनगर , दिपक लोहार , सागर गिरी इकबाल तडवी , शरद तायडे , मांगीलाल भिलाला , विलास तायडे , महेंद्र महाले , चंद्रकांत सोनवणे , शांताराम तायडे , संजय तायडे इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा