दरम्यान वेळीच पोलीसांनी आठ संशयीताना ताब्यात घेतल्याने वातावरण शांत झाले. अशा घटना याच परिसरात घडतं आहेत. गेल्या पंधरा दिवासात ही तिसरी घटना आहे. अशा टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्वच स्तरातून आता होऊ लागली आहे.
शाळकरी मुलांच्या हाणामारी, मुलींच्या छेडखाणीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत, अशातच दि ३ मंगळवार रोजी शाळा सुटल्यानंतर मुलगी आपल्या मैत्रीणी बरोबर घराकडे जात असताना काही टवाळखोरांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून मुलीची छेड काढली, हि बाब मुलीने घरी जाऊन भावाला सांगीतली. याचा जाब विचारण्यासाठी मुलीचा भाऊ त्या टवाळखोरांच्या जमावात जाऊन छेड का काढतो असा जाब विचारला असता, मुलीच्या भावाला आठ ते दहा जणाच्या जमावाने लाकडाच्या दाड्याने डोक्यात जबर मारहाण करीत जखमी केले. या घटनेने संपुर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान शहरात कोणताही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी सह पोलिस निरीक्षक आशिष अडसुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घाटनास्थळा कडे धाव घेत टवाळखोरांना ताब्यात घेत परिस्थीती नियंत्रणात आणली.
शहरात ऐन सणासुदीच्या दिवसात शहराचे वातावरण दुषित होऊ नये, व समाज कंटकानी डोके वर काढू नये व शहरात शांतता नांदावी यासाठी फैजपुर, सावदा, मुक्ताईनगर, बोदवड व जळगाव येथील दंगा नियंत्रक पथकाच्या जवानांना पाचरण करण्यात आले.
सदर हाणामारीत जखमी झालेल्या तरुणावर वरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या आठ संशयितांपैकी सहा जणांना बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. तर दोन जणांविरोधात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून आसीफ इकबाल शहा रा. (सिद्धेश्वर नगर), साबीर शरीफ खान (रा. खीडकी वाडा) यांच्या विरोधात पोक्सो कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उप निरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे.
सदर संशयीत आरोपी यांना भुसावळ न्यायालया समोर हजर केले असता त्या दोघाना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सदर अल्पवयीन मुलीच्या छेडखानीच्या घटना वारंवार घडत असल्याने मुलीच्यां आई वडीलांनी शक्यतो आपल्या पाल्यास शाळेत ने आण करावी व अनोळखी मुलानशी संर्पकात रहावु नये अशा सूचना द्यावी तर शाळे समोरील रोडच्या दोघ बाजुने असलेले मास विक्रीचे दुकाणे पुर्वी पासुन सुरू असलेल्या मटन मार्केट मध्ये स्थलांतरीत करण्याची मागणी नागरीकांनी व पालक वर्गा कडुन केली जात आहे कारण हे छेडखानी काढणारे टवारखोर यांच मास वीक्री च्या दुकानात आसरा घेत मुलीची छेड काढत असतात
टवाळखोराचे अड्डे
मुलीची छेड काढण्या करीता टवाळखोर मंडळी शहरातील दोन्ही विद्यालयाच्या आवती भोवती मुलीन समोर जोर जोराने मोटर सायकल चालवणे , त्यांच्या खासगी क्लासच्या रस्त्यावर चकरा मारणे , बस स्थानक परिसरात उभे राहून छेड काढणे असे अड्डे नित्याचे झालेले आहे
टिप्पणी पोस्ट करा