निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने रावेर तालुक्यातिल विविध समस्यांच्या संदर्भात रावेर येथे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर तालुका कार्यकारिणीच्या वतिने तहसिलदार रावेर यांना विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले .
     आज दि . ०९/१०/२०२३ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने रावेर तालुक्यातिल विविध समस्यांच्या संदर्भात मा . तहसिलदार रावेर यांना खालिल प्रमाणे नमुद असलेल्या विषयांचे निवेदन देण्यात आले .     
विषय १ ) रावेर ग्रामिण रुग्णालय येथुन प्रत्येक रुग्णास जळगांव सामान्य रुग्णालय येथे पाठवुन ग्रामिण रुगणालयाचे डॉक्टर वेळ  काढू पहात आहेत तरी या प्रकरणी सखोल चौकशी करून संबधितावर कारवाई करावी .                  
 २ ) रावेर ग्रामिण रुग्णालयात रुग्णांना औषधांचा पुरवठा व्यवस्थीत करण्यात यावा .                            ३ ) कुटूंब अर्थ सहाय्य तसेच संजयगांधी निराधार योजनेच्या अनुदानाचे वितरण तात्काळ करण्यात यावे .
 ४ ) रावेर ग्रामिण  रुग्णालयास महात्मा ज्योतिराव फुले यांचे नांव देण्यात यांवे .             
  तसेच लवकरच आमच्या मागण्यांचा विचार करून निराकरण न झाल्यास निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने जनहितार्थ आंदोलनात्मक भुमिका घेण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी असे निवेदन देतांना संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधिर सैगमिरे , युवक तालुका अध्यक्ष विजय धनगर , तालुका उपाध्यक्ष अनिल धनगर , तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments