फैजपुर प्रांत कार्यालय येथे दि.२७/१०/२०२३ रोजी असंघटीत कामगार मजूर वर्ग व बांधकाम ठेकेदार यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.

( प्रतिनिधी,किरण तायडे )

यावल ; फैजपुर प्रांत कार्यालय येथे दि.२७/१०/२०२३ रोजी असंघटीत कामगार मजूर वर्ग व बांधकाम ठेकेदार यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.
 जळगांव गीरणा नदी येथील वाळू चालु करावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
त्यास महाराष्ट्र एकलव्य विकास संघटना,जळगाव जिल्हा बांधकाम संघटना,सैयद असगर ( बाजार समिती सदस्य),पांडुरंग सराफ फैजपूर माजी नगराध्यक्ष,पिंटू भानुदास चोपडे न्हावी सरपंच यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे . संघटनेचा जाहीर पाठीबा असुन वरील मागणीसाठी निवेदन देण्यात आले. की, बहुसंख्येत आदिवासी व भटके विमुक्त तसेच गोर
गरीब कामगार वर्ग जसे बांधकाम मजुर, गवंडी, बिगारी, प्लंबर, पेन्टर, इलेक्ट्रीशीयन फि्टींग,
वीट भट्टी मजुर, पी.ओ.सी, सुतार, वेल्डर, इंजीनीअर, रेती डिलर तसेच बांधकामावर अवलंबुन असलेल्या व्यक्ती, ठेकेदार व मजूर वर्ग यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
तरी साहेबंना विनंती करण्यात येते की, गोर गरीब लोकांचे व त्यांच्या वर अवलंवून असलेल्या त्यांच्या परीवाराचा विचार करुन लवकरात लवकर गिरणा रेती चालू करण्यात यावी.अन्यथा बांधकामावर आधारीत व त्यांच्या उपजीवीका भागवीत असलेल्यांना सोबत घेवून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समस्त असंघटित कामगार मजूर वर्ग व बांधकाम ठेकेदार 
यांच्या वतीने देण्यात आला.
त्या प्रसंगी आशिक पिंजारी ,संजय सुकदेव,शेख रऊफ भुसावळ,नदीम अय्युब पिंजारी, जहांगीर शेख,मेहमूद शेख, कालु बेग,रशीद तडवी,अकबर खान , सैयद कुतबीद्दिन आदी उपस्थित होत.

0/Post a Comment/Comments