जळगांव जिल्ह्यातिल सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन प्रशासनाचे सामान्य जनतेच्या समस्या कडे लक्ष केंद्रित करण्या करिता जिल्हाधिकारी कार्यालय समोर निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले

जळगांव जिल्ह्यातिल सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन प्रशासनाचे सामान्य जनतेच्या समस्या कडे लक्ष केंद्रित करण्या करिता जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन - निळे निशाण सामाजिक संघटना 
  
       सर्व सामान्य जनतेच्या मुलभुत व जिवनउपयोगी अनेक समस्या थोडक्यात नमुद केलेल्या आहेत 
१ ) शासकीय व निमशासकीय माध्यमिक - उच्चमाच्यमिक शाळेन मध्ये संविधानाची प्रस्तावीकेचे वाचन सक्तीचे करावे .
२ ) गोरगरिबांना शिक्षणा पासुन वंचीत ठेवण्याचा प्रयत्न 
३ ) गोरगरिबांना स्वस्त धान्यापासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करावी
४ ) समाज कल्याण विभाग व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या वस्तीगृहामध्ये विद्यार्थी / विद्यार्थीनी यांचेवर होत असलेल्या अन्यायाची चौकशी होणे बाबत .                  
 ५ ) शासकिय वस्तीगृहातिल मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात  
६ ) स्थानिक बेरोजगारांचा प्रश्न .
७ ) शासनाची दिशाभुल करून बंद अवस्थेत असुन शासकिय अनुदान लाटणाऱ्या मुल / मुलींच्या आश्रम शाळेच्या चौकशी करणे बाबत 
८ ) शासकिय शाळेंच्या खाजगी करनाचा निर्णय थांबविणे बाबत
९ ) महिलांवंर होणाऱ्या अत्याचारांची पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेणे
१० ) शैक्षणीक क्षेत्रातिल मनमानी फि आकारणाऱ्या संस्थेवर कारवाई होणे बाबत.
११ ) जिल्ह्यातिल आरोग्य केंद्र तात्काळ कार्यान्वीत करणे . 
१२ ) शेतमजुर/केळी कामगार यांचा अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात द्यावी
१३ ) बेघर भुमिहिन कुटुंबांच्या व्यक्तींना रहात असलेल्या जागेवर घरकुल योजनेचा लाभ द्यावा .  
१४ ) औष्णीक विद्युत केंद्र दिपनगर भुसावळ येथिल कामगारांच्या सुरक्षेच्या संदर्भात चौकशी करणे 
१५ ) दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत विकासकामात होत असलेल्या भ्रष्टाचार संदर्भात चौकशी करणे संदर्भात अनेक वेळेला स्थानिक पातळीवर लेखी स्वरूपात निवेदण देऊन सुद्धा संबंधीत अधिकारी दुर्लक्ष करित असल्याने सर्वसामान्य जनतेच्या समस्या आपल्या निदर्शणास येतिल व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळेल या उद्देशाने आम्ही दि . १९ ऑक्टोबर २०२३ रोजी आंदोलन करण्यात आले . आमच्या मागण्या सर्वसामान्य जनतेच्या लोकहिताच्या असुन आमच्या मागण्याचा सहानभुतीपुर्वक विचार करून न्याय दयावा असे निवेदण देण्यात आले त्याप्रसंगी जळगाव जिल्हा प्रमुख सतिश जी वार्डे , जळगाव जिल्हा महिला आघाडी प्रमुख चारुलता सोनवणे , जि . उपप्रमुख नंदा भावटे , जि . सचिव वैशाली हेरोळे , जि उपाध्यक्ष अशोक तायडे , जि . कार्यध्यक्ष सदाशिव निकम , फैजपुर विभाग युवासेना प्रमुख सागर बाविस्कर , अमळनेर विभाग प्रमुख दिवानजी साळुंखे , यावल ता . अध्यक्ष विलास तायडे , चोपडा ता. अध्यक्षा अनिता बाविस्कर , चोपडा ता. युवक अध्यक्ष प्रविण करणकाळ , रावेर ता . अध्यक्ष सुधिर सेंगमिरे , रावेर ता . युवक अध्यक्ष विजय धनगर , रावेर ता . महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी अटकाळे , यावल ता . महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मी मेढे , जळगाव महानगर महिला आघाडी अध्यक्षा गिता वाघ , चोपडा शहर महिला आघाडी अध्यक्षा बबिता बाविस्कर , रावेर शहर युवक अध्यक्ष संकेत तायडे , ता .उपाध्यक्ष चंद्रकांत कोळी , अनिल धनगर , संजय तायडे , नलुबाई सोनवणे , कविता शिंदे , समिर तडवी , पिंकी सुतार , नवलसिंग बारेला तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments