सर्व सामान्य गोर गरिब व्यक्तींच्या समस्या सोडविण्यात याव्या यासाठी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने यावल तहसील येथे निवेदन देण्यात आले.
सर्व सामान्य गोर गरिब व्यक्तींच्या समस्या सोडविण्यात याव्या यासाठी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने यावल तहसीलदार,पाणी पुरवठा अधिकारी,पंचायत समिती,येथे निवेदन देण्यात आले.निवेदणात नमुद विषयांकडे लक्ष केंद्रित करून आमच्या समस्याचे निराकरण करावे असे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेच समस्या खलीली प्रमाणे आहे
१) बेघर भुमिहिन वास्तव्यास असलेल्या जागेवरच त्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा .
२) तालुक्यात काही स्वस्त धान्य दुकानदारांनि गेल्या दोन महिन्यात वाटप केली नाही त्यांचेवर कारवाई करण्यात यावी .
३) सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारांनि ग्राहकांना धान्याची पावति देणे सक्तीचे करावे .
४) गोर गरिब गरजु कुंदुबाला अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात यावे .
५) टेंभीकुरण येथिल रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे .
६) धुळेपाडा , आसराबारी पाडा , काळाडोह हे पाडे ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्यात यावे .
७) तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराना धान्य बिल पावती देण्याची सक्ती करावी .
८) धुळेपाडा येथिल पेजलयोजनेच्या टूबेलचे काम लवकरात लवकर सुरु करावे .
९) चिखली खु॥ येथिल समाजमंदीराच्या बाजूचे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे .
निवेदन देताना निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे,यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे, महिला आघाडी यावल तालुका अध्यक्ष लक्षमिताई मेढे, यावला तालुका उपाध्यक्ष अनिल इंधाटे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा