दि.१६ ऑक्टोबर २०२३ रोजी रावेर तालुक्यातील गोर गरीब शेतमजुर कष्टकरी जे अनेक वर्षापासून अतिक्रमण करून रहात आहे त्यांना त्याच जागेवर घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा . शेतमजुर - केळी कामगार यांचा अपघात झाल्यास त्यांना अर्थिक मदत मिळणेस उपाय योजना करण्यात यावी .अन्नसुरक्षा योजनेत सर्व सामन्य गोरगरिबांना समाविष्ट करण्यात यावे . निंभोरा बु॥ येथे पाण्याच्या टाकीचे नित्कृष्ट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे . निंभोरा बु॥ येथिल बेघर भुमिहीन गोरगरिबांना बेघर प्लॉट लाभर्थी यादीतुन जाणिव पुर्वक डावलण्यात आले त्यामुळे तयार करण्यात आलेल्या यादीची चौकशी करून खरोखर बेघर भुमिहीन व्यक्तींचा यादीमध्ये समावेश करण्यात यावा .या मागण्याचे निवेदन निळे निशाण सामाजिक संघटना रावेर तालुका कार्यकारणीच्या रावेर तहसिलदार यांना देण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम , तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , युवक तालुका अध्यक्ष विजय धनगर , महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा नलूताई सोनवणे , ता . उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे , ता . उपाध्यक्ष संजय तायडे , ता . संपर्क प्रमुख समिर तडवी , अकिल खान , कुंदन तायडे तसेच असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते .
गोर गरिबांच्या समस्या शासनाच्या निदर्शणास आणून देण्याकरिता रावेर तहसिलदार यांना निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
गोर गरिबांच्या समस्या शासनाच्या निदर्शणास आणून देण्याकरिता रावेर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले - निळे निशाण सामाजिक संघटना
टिप्पणी पोस्ट करा