मुक्ताईनगर येथील घटना | पुतळा विटंबने प्रकरणी | राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

मुक्ताईनगर येथील घटना | पुतळा विटंबने प्रकरणी | राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल 

मुक्ताईनगर येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबने प्रकरणी संतप्त जमावाच्या मागणीनुसार रात्री उशिरा राष्ट्रवादीचे दोघं पदाधिकारी व इतर अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पोलिसांना संतप्त जमावाला शांत करण्यात मोठे यश आले असून पोलिस निरीक्षकांच्या समय सुचकतेने पुढील अनर्थ टळलेले आहे . 

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , फिर्यादी शुभम धिरज भालेराव , वय- 19 , ) रा . आंबेडकरनगर , मुक्ताईनगर ता . मुक्ताईनगर जि . जळगाव यांनी पोलीस ठाण्यात हजर होवुन फिर्याद लिहून दिलेली आहे की , फिर्यादी व नाना जनार्धन बोदडे , अजय अनिल तायडे सर्व रा . आंबेडकरनगर , मुक्ताईनगर असे प्रवर्तन चौकात असलेले महापुरुषांचे पुतळ्यांची दररोज नियमीत पणे सकाळ संध्याकाळ स्वच्छता व साफसफाई करीत असतात . काल दिनांक 02/09/2023 रोजी सकाळी 07:00 वाजेच्या सुमारास फिर्यादी व नाना जनार्धन बोदडे , अजय अनिल तायडे असे नेहमी प्रमाणे प्रवर्तन चौकातील महापुरुष डॉ . बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहु महाराज व महात्मा ज्योतीबा फुले यांची पुतळ्यांची साफसफाई केली तेव्हा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुस्थितीत होता . त्यानंतर आमदार श्री एकनाथ खडसे यांचे वाढदिवासानिमित्त काल मुक्ताईनगर शहरामध्ये आयोजक राष्ट्रवादीचे पदाधिकारी लक्ष्मण उर्फ बबलु रमेश सापधरे , राजेंद्र गणपत माळी दोन्ही रा . मुक्ताईनगर हे कार्यकर्त्यांची मोटार सायकल रॅली काढणार असल्याने त्याकामी ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता . दुपारी साधारण 03.30 से संध्याकाळी 04.30 वाजेच्या दरम्यान मोटार सायकल रॅली प्रवर्तन चौकात आल्यावर आयोजक व त्यांचे सोबत असलेले इतर पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे पुतळ्यांना पुष्पहार अर्पन करुन फुले उधळले होते . त्यानंतर फिर्यादी व नाना जनार्धन बोदडे , अजय अनिल तायडे असे नेहमी प्रमाणे रात्री 08.00 वाजेच्या सुमारास पुतळ्यांचे जवळील पुष्पहार व अर्पन केलेले फुले आवरण्यासाठी गेलो असता डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजुच्या चष्म्याची दांडी तुटलेली दिसली म्हणुन त्यांनी त्याबाबत समाज बांधव यांना माहीती दिल्याने आंबेडकरी समाज बांधवांनी प्रवर्तन चौकात जमा होवुन महापुरुषांच्या पुतळ्यांची पाहणी केली असता दुपारी 03.30 ते 04.30 वाजेच्या सुमारास रैली मधील आयोजक व इतरांनी पुष्पहार अर्पन व फुले उधळीत असताना डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचेच चष्म्याची डाव्या बाजुची दांडी तोडुन नुकसान करून पुतळ्याची विटंबना करून समाजबांधवांच्या धार्मिक भावणा दुखावल्या गेल्या आहे . म्हणून सदर मोटार सायकल रॅली काढणारे आयोजक लक्ष्मण उर्फ बबलू रमेश सापधरे , राजेंद्र गणपत माळी दोन्ही रा . मुक्ताईनगर व त्यांचे सोबत असलेले इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली असून तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध भांदवि कलम भारतीय दंड संहिता 295 , 427 , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंध ) अधिनियम 1989 अन्वये 3 ( 1 ) ( t ) प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले असून तपास उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे करीत आहे . 

दरम्यान याप्रकरणी आणखी काही इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नावे निष्पन्न करून दाखल गुन्ह्यात नावे समाविष्ट करण्याचे आश्वासन संतप्त नागरिकांना पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी दिले होते व जमावाला शांत करण्यात त्यांना यश आले होते.

0/Post a Comment/Comments