आपल्या पो . स्टे . हद्दीतिल चिखली खुर्द गांवातिल काही समाज कंटकांनी जातिय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिस प्रशासनाला खोटी आणि बनावटी माहिति देऊन बौद्ध समाजाच्या चार व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे तरी आपण या प्रकरणाची सखोल चौकशि करून पोलिस प्रशासनाला खोटी माहिती देऊन प्रशासनाच्या महत्व पुर्ण वेळेत जाणिव पुर्वक व्यत्यय आणुन शासकिय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच जाणिव पुर्वक बनाव करून मराठा समाजाच्या लोकांना या बनावटी प्रकरणात सामिल करून दोन समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या व्यक्ती विरूदध कठोर कारवाई करून बौद्ध समाजाला न्याय देऊन दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची तात्काळ दखल घ्यावी हि विनंती
महोदय , आपण या प्रकरणि सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावि अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने बौद्ध समाजाच्या त्या चार व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच दोन समाजात पेटणारा संघर्ष टाळण्यासाठी आंदोलन करावे लागेल याची कृपया नोंद घ्यावी असे निवेदन निळे निशाण सामाजिक संघटने च्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे फैजपुर ता . यावल जि .जळगांव येथे देण्यात आले.
त्या प्रसंगी निवेदन देताना निळे निशाण सामाजिक संघटने उपजिल्हा अध्यक्ष अशोकभाई तायडे,यावल तालुका अध्यक्ष विलासभाऊ तायडे, यावल तालुका उपाध्यक्ष इकबाल तडवी, यावल तालुका महिला मंच अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे,फैजपूर विभाग अध्यक्ष शांताराम तायडे,फिरोज तडवी,फैजपूर शहर अध्यक्ष आबिद कुरेशी,नसीर पैलवान कुरेशी आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा