म.पोलिस अधीक्षक सो.जळगांव यांना निवेदन देण्यात आले.
दि . ०४ /०९/ २०२३ रोजी चोपडा शहर पोलिस स्टेशन मधून चहार्डी ता . चोपडा शाखेचे निळे निशाण सामाजिक संघटनेचे शाखा अध्यक्ष उदय मोरे यांना पोलिस स्टेशन मध्ये बोलविण्यात आले व तालुका कार्यकारणीतिल इतर चार ते पाच महिला पदाधिकारी यांना घेऊन उदय मोरे यांच्या सोबत पोलिस स्टेशनमध्ये गेले असता त्या ठिकाणि पोलिस निरीक्षक के . के . पाटील बसलेले होते.
आम्ही त्यांच्या कॅबिन मध्ये गेल्या बरोबर कॉन्सटेबल पवार यांनी पाटील साहेबांना उदय मोरे चे नाव सांगितल्या वर पाटील साहेबांनी काही एक कारण नसताना उदय मोरे यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली तुला माज आला आहे का तुझे हात पाय तोडुन टाकेल पवार या साल्यावर चाप्टर केस टाकुन मधे टाका हरामखोराला तेव्हा कळेल अश्या अश्लील भाषेचा वापर केला
आम्ही सर्व अनुसुचित जातिचे असुन आम्हाला द्वेष बुद्धीने अपमानित करून पोलिस स्टेशनच्या बाहेर काढून देणे उदय मोरे यांना काहि कारण नसताना पोलिस स्टेशन मध्ये बोलविणे शिविगाळ करणे धमकावणे आपल्या पदाचा दुरुपयोग करणे पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्याना परवानगी देणे दारू ,सट्टा , पत्ता अश्या बेकायदेशीर कार्याला परवानगी देणे आणि बौद्ध धर्माच्या खिरदान च्या कार्यक्रमाला परवानगी घ्यावी असे सांगणारे पाटील साहेब हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून पोलिस प्रशासनाच्या प्रतिमेला मळीन करण्याचा प्रयत्न करीत आहे तरी त्यांच्या विरुद्ध योग्य ति कारवाई करण्यात असे निवेदन निळे निशाण सामाजिक संघटने च्या वतीने देण्यात आले.त्या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सतिश जी वाडे, नंदाताई बावीस्कर,चोपडा तालुका अध्यक्ष महिला मंच अनीताताई बावीस्कर,चोपडा तालुका महिला मंच उपाध्यक्ष बबिताताई बावीस्कर,यावल तालुका अध्यक्ष विलासभाऊ तायडे,यावल तालुका महिला मंच अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे, चाहर्डी शाखा अध्यक्ष उदय मोरे, चाहर्डी शाखा उपाध्यक्ष विक्की मोरे आदी उपस्थित होते.
प्रत रनावा -
मा . ना . देवेंद्र फडणवीस ( गृहमंत्री ) सो . म . राज्य
मा . पोलिस महासंचालक सो . ( मुंबई )
मा . पोलिस महानिरिक्षक सो . ( नाशिक )
मा . अनुसुचित / जमाती आयोग सो . ( न्यु दिल्ली )
मा . पोलिस तक्रार प्राधिकरण अधिक्षक सो .( मुंबई )
मा . जिल्हाधिकारी सो .
( जळगाव )
टिप्पणी पोस्ट करा