संतापाच्या भरात भाजी विक्रेत्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आपले जीवन संपवले. मनवेल ता.यावल येथे ही घटना घडली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. नितिन अमृत कोळी (३१) असे तरुणाचे नाव आहे.
याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
यावल तालुक्यातील मनवेल येथे नितिन अमृत कोळी हा तरूण वास्तव्याला होता. भाजीपाला विक्री करून आपला प्रपंच चालवित होता. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून त्याने आज सकाळी ९ वाजेच्यापुर्वी राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत मयताचे काका शांताराम पंढरीनाथ कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत नितिन कोळी यांच्या मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा