बौद्ध समाजाच्या सरपंचाला मारहाण करणाऱ्या गावगुंडांवर कठोर कारवाई करा - निळे निशाण सामाजिक संघटना

बौद्ध समाजाच्या सरपंचाला मारहाण करणाऱ्या गावगुंडांवर कठोर कारवाई करा - निळे निशाण सामाजिक संघटना
       अमळनेर तालुक्यातील दहिवद गावामध्ये पोळा सण साजरा करित असतांना गावातिल काही माहितिचा अधिकार टाकून ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने दहशत पसरविणाऱ्या गावगुंडानी दहिवद गावातिल बौद्ध समाजाच्या सरपंचाना जातिय द्वेषापोटी बेदम मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडलेला असून दि .१५/०९/२०२३ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या चोपडा तालुका महिला आघाडी अध्यक्षा अनिताताई बाविस्कर व त्यांच्या सहकारी यांनी दहिवद गावी जावून पिडित सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेतली तसेच घडलेली घटना हि निंदनिय असून घडलेल्या घटनेचा निषेध केला व भविष्यात गावामध्ये असे प्रकार घडू नये त्याकरिता शासनाने उपाय योजना करून जातियवादी मानसिकतेच्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली त्याप्रसगी उपस्थित अनिताताई वार्डे , मायाताई कोळी ' बबिताताई बाविस्कर , अनिताताई अहिरे , उदय मोरे , प्रविण करणकाळ यांनी संघटनेच्या निर्णयाचे समर्थन केले .

0/Post a Comment/Comments