नागरिकांमधूनही तीव्र संताप अनावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेर्धात सोमवारी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा आज मराठा समाज राज्यभरातून निषेध नोंदवित आहे.
सकल मराठा समाजाकडून घटनेचा आज नांदेडमध्ये निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज आणि मराठा संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. येत्या सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ नांदेड बंदची हाक देखील देण्यात आली. हा बंद शांततेने पार पाडावा असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा