भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत तिच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली होती . या गुन्ह्यातील संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे . पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला भडगाव पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले आहे .
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की , स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील ( वय १ ९ ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे . तालुक्यातील एका गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती . २ ९ जुलै रोजी पिडीत मुलगी दुपारी घरी एकटी असतांना गावात राहणारा स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील याने पिडीत मुलीला गुरांच्या गोठ्यात बोलावून घेतले . त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला . त्यानंतर तिने घराच्या हा प्रकार सांगेल असे सांगितल्यानंतर संशयित आरोपी स्वप्निल पाटील हा घाबरला . गावात आरडाओरड करेल या भीतीने त्याने तिच्या डोक्यात दगड टाकून खून केला . त्यानंतर कुणाला संशयित येवून नये म्हणून गोठ्यात असलेल्या कडब्याच्या कुट्टीत लपवून ठेवले . मुलगी बेपत्ता झाल्यानंतर भडगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती . दरम्यान , दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीला आला . मुलीचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली होती. भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले . याप्रकरणात संशयित आरोपी स्वप्निल पाटील याला ताब्यात घेतले . त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली . त्यानुसार त्याच्यावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
जिल्हा पोलीस अधिक्षक एम . राजकुमार , अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख , स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे , गणेश चोभे , पोहेकॉ विजयसिंह पाटील , सुधारक अंभोरे , विजय पाटील , लक्ष्मण पाटील , प्रितम पाटील , महेश महाजन , अनिल जाधव , अकरम शेख , किशोर राठोड , ईश्वर पाटील , किरण चौधरी , हेमंत पाटील , हरीष परदेशी , महेश पाटील , रमेश जाधव , भारत पाटील , प्रमोद ठाकूर , दर्शन ढाकणे यांनी कारवाई केली आहे .
टिप्पणी पोस्ट करा