विहिरीत आढळला तरूणाचा मृतदेह

यावल शहरालगतच्या विरावली शिवारातील विहीरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या संदर्भात मिळालेली अशी की यावल शहरा पासुन सुमारे दोन किलोमिटर लांब चोपडा मार्गा वरील दरबारसिंग शांताराम पाटील यांच्या विरावली शिवारातील शेत गट क्रमांक१७५ च्या शेतातील सुमारे १३० फुट खोल असलेल्या विहीरीतीत पडून पाण्यात बुडून ३०ते ३५ वर्ष वयाचा अज्ञात तरूण मरण पावल्याची घटनासमोर आली आहे.

 दिनांक५ऑगस्ट रोजी शेतात कामास गेलेल्या महीलांना विहीरीतुन दुर्गंधीचा वास आल्याने त्यांनी शेतमालकास सदरची माहिती दिल्याने शेतमालक दरबारसिंग यांनी सदरची माहीती दिली. त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. या अनुषंगाने मृतदेह विहिरीतून काढण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments