दि. ०३/०८/२०२३ रोजी विविध मागण्यासाठी निळे निशान सामाजिक संघटनेच्या वतीने फैजपूर प्रांतअधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. जाणून घ्या काय आहे मागण्या!

जाहिर निवेदन मा.उपविभागीय अधिकारी सो .फैजपूर भाग फैजपूर द्वारा मा . मुख्यमंत्री सो . , महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सविनय सादर . दि. ०३/०८/२०२३ रोजी
निळे निशान सामाजिक संघटनेच्या वतीने दलीत आदिवासी मुस्लीम .समाजावरील अन्याय अत्याचाराविरूध्द जाहिर निवेदन देण्यात आले.

उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र राज्यामध्ये दलीत आदिवासी मुस्लीम समाजावर अन्याय अतयाचार व सातत्याने रोज हल्ले होत आहेत . अत्याचाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेले तर पोलीस प्रशासन पिडीतांवरच खोटे गुन्हे दरोडयाचे व ( ३५३ ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची धमकी देवून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालत आहे.
पोलीस प्रशासनाच्या अशा वागणुकीमुळे यातुन स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ आहे की काय इ . अशी शंका येत आहे . 

त्यामुळे संवीधान माननाय मानवतावादी लोकांना या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढावेच लागेल व अशा गुंड प्रवृत्तीच्या विरोधामध्ये कायदा आणि सुव्यवस्थ अबाधीत राखण्यासाठी निळे निशान सामाजिक संघटनाच्या वतीने फैजपूर प्रांताधिकारी साहेबांना जाहीर निवेदन देण्यात येत आहे त्या निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे १ ) मणिपुरमध्ये आदिवासी माहिलेची नग्न धिंड काढण्यात आली त्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी . 

२ ) महाराष्ट्रामध्ये दररोज महापुरूषांबद्दल गरळ ओकणाऱ्या शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडेला अटक करून राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत न माणणाऱ्या संभाजी भिडेला देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व तयाच्या सभांना बंदी घालण्यात यावी . 

३ ) वनाधिकार कायदा २००६ व नियम २००८ प्रमाणे आदिवासींनी ज्या वनजमिनींचे दावे दाखल केले आहे त्या काही पात्र व काही बुध्दीपुरस्कर अपात्र करण्यात आले आहे . तरी यावल रावेर चोपडा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी अपिल अर्ज जिल्हाधिकारी साहेबांकडे दाखल केले असून त्यांचा जोपर्यंत निकाल होत नाही . तोपर्यंत फॉरेस्ट कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांनी काढलेलया शेतजमिनीचे कोणत्याही प्रकारे वृक्षलागवडच्या नावाखाली नुकसान करू नये . 

४ ) सातपुडा पर्वतात असलेल्या अतिदुर्गम भागातील वस्तिशाळांमध्ये जे शिक्षक आहेत ते महिन्यातून फक्त एक ते दोन दिवस जातात आणि शासनाचा पुर्ण पगार घेतात अशा शिक्षकांची चौकशी करून त्यांना आदिवासींना शिक्षणापासून व पोषण आहारापासून वंचीत ठेवणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्यात यावे . 

५ ) चालु वर्षी अतिवृष्टीमुळे ज्या नागरिकांचे नुकसान झाले तयांचे संसारउपयोगी साहित्य अन्न - धान्य पुराच्या पाण्यात वाहून गेले अशा गांवाना शासनाने तात्काळ मदत जाहिर करावी . 

६ ) सांगली जिल्हयाततील बेडग गांवामध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडण्यात आली तेथील सरपंच उपसरपंच व संबंधिक लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी . ७ ) कलम ३५३ चा सरकारी अधिकारी गैरफायदा उचलत आहे जो कोणी व्यक्ती सरकारी अधिकाऱ्याला प्रश्न किंवा माहिती विचारायला जातो तर असे भ्रष्ट अधिकारी त्यांना कलम ३५३ चा धाक दाखवून त्यांना गप्प करतात व सरकारी कामात अडथळा आणला असा ठपका ठेवत पोलीसांकडून भारतीय दंड विधानातील कलम ३५३ चा गैरवापर करण्यात येत आहे ती कलम ३५३ रद्द करण्यात यावी . 

८ ) महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती व जमाती विकास निधी ( आर्थिक संसाधन नियोजन वितरण आणि उपयोग ) कायदा हा बजेटचा कायदा करणेत यावा . 

९ ) ३ जानेवारी २०१७ या शासननिर्णयावरून आदिवासींची अतिक्रमणीत घरे नावार करणे . 

१० ) मोहराळा ता.यावल येथील विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळण्याची विटबंना करण्यात आली होती त्या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी . 

११ ) यावल तालुक्यात खुलेआम चालु असलेल्या अवैध धंदयांना उदा.सट्टा , पत्ता , हातभट्टी विनापरवाना देशी विदेशी दारू आदी सर्व बंद करण्यात यावे .
अशा सर्व घटनांचा निळे निशान सामाजिक संघटनाच्या वतीने जाहिर निषेध करीत आहोत . आम्ही महाराष्ट्र सरकारला इशारा देतो की वरील मागण्यांचा गांभीर्य पुर्वक विचार झाला नाही तर निळे निशान सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष सतिषजी वाडे व युवक जिल्हा अध्यक्ष अनुपभाऊ मनुरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात संघटनेच्या वतीने जन आंदोलन उभे करू . त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाला तर यास महाराष्ट्र शासन व प्रशासन जबाबदार राहील याची शासनाने नोंद घ्यावी. फैजपूर प्रांतअधिकारी साहेब यांना निवेदन देताना निळे निशाण सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते जिल्हा उपाध्यक्ष अशोकभाई तायडे, यावल तालुका अध्यक्ष विलासभाऊ तायडे, यावल तालुका उपाध्यक्ष इकबाल तडवी,युवक तालुका अध्यक्ष सतिशभाऊ अडकमोल, युवक तालुका उपाध्यक्ष सुकदेव इंधाटे,महिला मंच यावल तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे, रावेर/यावल विधानसभा उपाध्यक्ष शांताराम तायडे,फैजपूर शहर अध्यक्ष आबिद कुरेशी,यावल शहर प्रमुख शेख फारुख शेख मुस्ताक,शेख जमिरोद्दीन शेख फकिरोद्दीन उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments