सावखेडासिम पंचायतच्या अपहारा प्रकरणी उपोषणाच्या आठव्या दिवसी महाविकास आघाडी व निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनानंतर उपोषणाची लिखित आश्वासने सांगता

यावल ;विशेष लेखा परिक्षणात अपहार सिद्ध झाल्यास अपहार व अनियमितता बाबत प्रशासकीय कारवाई व अपहारा विरुद्ध गुन्हे दाखल करून संबधीतांकडून अपहाराची रक्कम वसुल करण्यात येईल तसेच सद्यस्थितीत प्राथमिक चौकशी अहवालात सिद्ध होणाऱ्या अनियमिता संदर्भात संबंधित ग्रामसेवकावर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असुन , नैसर्गीक न्यायत्वानुसार संबधीतास शिक्षा करणे पुर्वी बाजु मांडण्याची संधी देण्यात येणार असुन या अपहार प्रकरणी सदर समुचित कारवाई करण्यात असुन , या साठी विशेष लेखा परिक्षणच्या पथका समक्ष उपोषणकर्ते शेखर पाटील यांनी माहिती अधिकारातुन मिळवलेल्या पुराव्यांच्या आधारावर आपली माजु मांडता येईल असे लिखित आश्वासन जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पाटील यांनी दिलेल्या लिखित आश्वासनाने आठ दिवसापासुन पंचायत समिती समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर यशस्वी सांगता झाली . तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायत मध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या अपहारा प्रकरणी संबधीतांनी दिलेल्या अहवाल वरून चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी यावल पंचायत समिती च्या , कार्यालया समोर आमरण उपोषणास बसलेले पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील व त्यांचे सहकारी रहेमान रमजान तडवी व सलीम मुसा तडवी यांच्या उपोषणाची आठव्या दिवसी सहा तासाच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख कार्यकारी अधिकारी पाटील यांच्या लिखित आश्वसनाने आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन या संघर्षमय उपोषणाची अखेर सांगता झाली . दरम्यान उपोषणांच्या आठव्या दिवसी दिनांक २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११,३० वाजे पासुन कॉंग्रेस पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना
 ( उ.बा.ठा. गट ) या महाविकास आघाडीसह निळे निशाण या सामाजीक संघटनेच्या वतीने यावल शहरातील राज्य महामार्गा वरील भुसावळ टी पाँईंठवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे सहा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले , या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रवीन्द्र सोनवणे , धनंजय शिरीष चौधरी , निळे निशान या सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , तालुका अध्यक्ष विलास तायडे ,तालुका संपर्क प्रमुख दीपक मेढे, संघटनेच्या महीला तालुकाअध्यक्ष लक्ष्मीबाई मेढे , यावलचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते , आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी , तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदविला , सुमारे सहा तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलना मुळे यावल शहरा पासुन भुसावळ मार्गावर अंजाळे गावापर्यंत तर यावल चोपडा मार्गावर तिन ते चार किलो मिटर आणी यावल फैजपुर मार्गावर तिन किलोमिटर पर्यंत विविध मोटर वाहनांची फार मोठी रांग लागल्याचे दिसुन आले , यावेळी या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली तसेच यावल आगाराच्या सुमारे ४६ एसटीच्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याची माहिती आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी पत्रकारांना दिली , त्यामुळे शाळकरी विद्यार्थीसह प्रवासी नागरीकांचे फार हाल होवुन त्रास सहन करावे लागले . दरम्यान उपोषणाच्या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पाटील , आमदार शिरीष चौधरी , तहसीलदार मोहनमाला नाझीरकर , गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड , विस्तार अधिकारी हबीब तडवी यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थित राष्ट्रगीताने या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली .

0/Post a Comment/Comments