यावल येथील पंचायत समिती समोर सावखेडासिम ग्राम पंचायत च्या अपहार प्रकरणी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली दोन जणांना उपचारासाठी रुग्णालय हलवले

यावल तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायतच्या झालेल्या लाखो रुपयांच्या अपहारा प्रकरणी यावल पंचायत समितीच्या , कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील व त्यांचे सहकारी रहेमान रमजान तडवी व सलीम मुसा तडवी यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असुन , तिघ उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असुन , आज सकाळी १० वाजता यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी वैद्यकीय सुत्रांच्या सुचने वरून उपोषणार्थींच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने तात्काळ त्यांना पोलीस प्रशासनाने उपोषणाच्या स्थळी रूग्णवाहीका आणुन उपोषणकर्ते सलीम मुसा तडवी व रहेमान रमजान तडवी यांनी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असुन , उपोषणांच्या ठीकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आले आहे . दरम्यान उपोषणाच्या ठिकाणी पंचायत समिती प्रशासनाचा ग्रामस्थांच्या ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे .

0/Post a Comment/Comments