यावल तालुक्यातील न्हावी येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 (न्हावी प्रतिनिधी,किरण तायडे)
यावल तालुक्यातील न्हावी येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
१५ऑगस्ट स्वतंत्र दिना निमित्त न्हावी येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेतील मुला मुलींनी देश भक्त पर गीत,नाटक,भाषण भाग घेतले होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी युसुफ अली रियासात अली यांनी केले व सूत्रसंचालन फरहत अली रिफाकत अली यांनी केले. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर खान,शब्बीर खान,सदस्य मोहम्मद आशिक, अ.रज्जाक पिंजारी , शे. मेहमुद शे.शब्बीर पिंजारी,शे.शहनाज शे.बिस्मिल्ला रईस खान, हमीद खान यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमा ठिकाणी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच पालक वर्ग शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक,स्टाफ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच असलम खान,गुलाम खान उपस्थित होते.
व तसेच उर्दू शाळेचे व्यवस्थापक समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन गावापुढे एक मोठा आदर्श ठेवला व ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच न्हावी येथील ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी   उपस्थिती होते.

0/Post a Comment/Comments