भुसावळ येथील खोब्रागडे कुटुंबाने स्वखर्चाने सुरु केली क्रांतीवीर बिरसा मुंडा स्कूल
यावल तालुक्यातील सातपुड़ा पर्वताच्या डोंगर रांगेत वसलेले आसराबारी गाव हे पाडा म्हणून ओळखले जाते . या ठिकाणी ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन गावातील आदिवासी मुलांसाठी स्वखर्चातून भुसावळ येथील दांपत्याने क्रांतीवीर बिरसा मुंडा या नावाने आदिवासी बालकांसाठी शाळा सुरू केली आहे .
जागतिक आदिवासी दिन अर्थात ९ ऑगस्ट रोजी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाने ही शाळा सुरू करण्यात आली आहे . आज सरकार स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करत आहे . असे
अनेक गावांमध्ये शाळाच नाहीत . असून ही आज ही आपल्या देशात शिक्षणापासून आदिवासी समाज बांधवांची मुले वंचित राहू नयेत म्हणून मोहराळा येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश अडकमोल यांनी भुसावळ येथील दांपत्य डॉ . दिगंबर
खोब्रागडे यांच्याकडे विनंती केली . खोब्रागडे व त्यांची पत्नी वंशिका शासन जोपर्यंत येथे काही प्रयोजन करत नाही , तोपर्यंत या मुलांच्या आयुष्याचा विचार म्हणून त्यांना शिक्षण देवू असे सांगून त्यांनी स्वखर्चातून हा प्रकल्प तयार
केला .
९ ऑगस्ट रोजी आसराबारी या आदिवासी पाडयावर क्रांतीवीर बिरसा मुंडा स्कूल या नावाने उद्घाटन करुन स्वखर्चातून शाळा सुरु करण्यात आली . या प्रसंगी भालोद कॉलेजचे प्राचार्य डॉ . किशोर कोल्हे , वड़ी येथील सरपंच अजय भालेराव , परसाडे येथील ग्रापंचायत सदस्य राजू तडवी , सामाजिक कार्यकर्ते सतीश अडकमोल , आसराबारी येथील मळू बारेला , जुवानशिंग उपस्थित होते . भुसावळ येथील बारेला , दिदास बारेला व ग्रामस्थ खोब्रागडे कुटुंबाने आदिवासी समाज बांधवांच्या चिमुकल्या मुलांसाठी पाड्यावर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात
येत आहे .
टिप्पणी पोस्ट करा