नव्हती . एवढ्यावर न थांबता आमदारांनी स्वतः केलेल्या शिवीगाळचे समर्थन देखील केले .
या वादाचा कळस म्हणून काल दुपारी पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ बघितल्याने समाजमन सुन्न झाले आहे . संदीप महाजन हे पाचोटा शहरात पत्रकारिता करतात . त्यांच्या परिवारासह पाचोटा शहरात राहतात बुधवारी 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते रेल्वेच्या आंदोलनाची बातमी घेऊन त्यांच्या घरी जात असताना महानगरपालिकेसमोर अज्ञातानी त्यांच्या तोंडावर रुमाल फेकत दुचाकीवरून खाली पाडले त्यानंतर चार ते पाच गुंडांनी लाथा बुक्क्यांनी तुडवत त्यांना बेदम मारहाण केली . व आमच्या किशोर आप्पाच्या नादी यापुढे लागलास तर याद राख अशी धमकी त्यांना गुंडांनी दिली . या घटनेनंतर घाबरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे . यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला . या घटनेचा तीव्र निषेध निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील 29 गावाचे पत्रकार बंधूनी केला .
निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो . निरीक्षक गणेश धुमाळ व पीएसआय रा.का.पाटील यांना निवेदन आले . निवेदन प्रसंगी रावेर पत्रकार समितीचे ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रदीप जी महाराज पंजाबी , म.रा.मराठी पत्रकार संघाचे रावेर तालुकाध्यक्ष प्रमोद कोंडे , जेष्ठ पत्रकार राजू बोरसे , सुनील कोंडे , अनिल आसेकर , प्रवीण धुंदले , विनायक जहुरे , कांतीलाल गाढे , भीमराव कोचुरे , विजय काशिनाथ अवसरमल , संकेत पाटील , सादिक पिंजारी , युसुफ खाटीक , विजय अवसरमल , जमील शेख , प्रभाकर महाजन , संजय पाटील , सद्दाम पिंजारी , राजेंद्र महाले , विनोद कोळी , शेख इद्रिस , दिलीप सोनवणे , दस्तगीर खाटीक आदी निवेदना प्रसंगी उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा