दि .०६/०७/२०२३ गुरुवार रोजी जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील निभोंरा बु॥ येथिल बेघर - भुमिहिन - शेतमजुर लोकांनच्या समस्या शासनाने सोडवावे या करिता निळे निशाण सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम यांच्या प्रमुख उपस्थित रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर , रावेर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत कोळी , रावेर तालुका महिला मंच अध्यक्षा विदयाताई बाविस्कर , रावेर तालुका महिला मंच उपाध्यक्षा नलुताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निभोंरा बु॥ ग्राम पंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले .
ठिय्या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली व घोषणांनी परिसर दणाणून सोडला बेघर - भुमिहिनाना जागा मिळायलाच पाहिजे , बेरोजगारांना रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे मिळायलाच पाहिजे , महिलांनसाठी शौचालयाची व्यवस्था झालीच पाहिजे या घोषणा देण्यात आल्या व काही वेळाने निभोंरा बु॥ चे ग्रामसेवक यांनी आंदोलनकर्त्यांना लेखीस्वरूपात आश्वासन दिले व संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले त्यावेळेस असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा