येथील आठवडे बाजारा लगतच्या पेट्रोल पंपाच्या काही अंतरावरील मागील बाजुस असलेल्या पंचशील नगर वस्तीतील एका घराला सकाळच्या सुमारास अचानक झालेल्या गॅसगळती मुळे लागलेल्या आगीत जिवनावश्यक वस्तु सह मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने मोठी जिवितहानी टळली मात्र या आगीमुळे कुटुंब उघड्यावर पडल्याची घटना घडली आहे.
यावल शहरातील पंचशिल नगर पॅट्रोल पंपाच्या मागील बाजुस राहणारे सिताराम भगवान भोई यांचे घरातील गॅस सिलेंडर गळतीमुळे शनिवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडर अचानक गळती झाल्याने लागलेल्या आगीत घरावरील १५ पत्र्यासह संसारोपयोगी वस्तू व ४६हजाराची रोख रकमेसह जळून खाक झाले आहे. वेळीच कुटुंबातील लोकांनी दक्षता घेतल्याने प्राणहानी टळली.
दरम्यान घटनेची खबर मिळताच यावल नगरपालिके च्या अग्निशामन बंबाने परिसरातील नागरीकांच्या मदतीने आग विझविण्यात यश मिळाले असुन भोई यांच्या घराच्या शेजारी राहणारे यांच्या देखील लगतच्या घरांचे या गॅसगळती मुळे लागलेल्या आगीत घराचे नुकसान झाले आहे.
तलाठी ईश्वर कोळी यांनी अनिल नीलकंठ गजरे भीमराव रतन गजरे या पंचा समक्ष एक लाख ४६ हजार रुपये किमतीच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. त्यासोबत यावल पोलिसांच्या वतीने सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण तसेच पोलीस कॉस्टेबल राजेंद्र पवार यांच्यासह एचपी गॅस कंपनीच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा