यावल तालुक्यातील हंबर्डी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमान गेट उद्घाटन वेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांची दांडी.

यावल तालुक्यातील हंबर्डी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमान गेट उद्घाटन वेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांची दांडी.
हंबर्डी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर कमान गेट मंजूर झाली असून 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमान गेट ला मंजूर झाल्या पासून विरोध ग्रामपंचायत व सरपंच सदस्य यांनी केला होता तरी आंबेडकरी समाजाने विचारणा केली असता सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी ग्रामपंचायत सदस्य विलास तायडे यांना सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर कमान गेट तुम्ही तिकडे मागे एका बाजूला कोपऱ्यात घ्या समोर तुम्हाला करता येणार नाही असे ग्रामपंचायत सदस्य विलास तायडे यांना सांगितले पण आंबेडकरी समाजाने विलास तायडे यांना सांगितले की कमान गेट हे बौद्ध वस्तीत ये जा करण्या करिता असते व ते एका बाजूला कशी घ्यायची कमान गेट हे बौद्ध वस्तीत च्या मुख्य रस्त्यावर च घेण्यात यावे असे विलास तायडे ग्राम पंचायत सदस्य यांना सांगितले.
तसेच विलास तायडे यांनी ग्राम पंचायत कार्यालय मध्ये ग्रामसेवक, सरपंच , उपसरपंच ,सदस्य यांच्या समोर प्रश्न मांडला तरी त्या ठिकाणी ही विरोध करण्यात आला तेव्हा त्या ठिकाणी ग्रामसेवक यांनी त्यांना सांगितले किती जणाचा होकार व नकार आहे असे सांगा व त्यावर तुम्ही विरोध करणारे किती आहे आणि मान्य करणारे किती आहे त्या वर ठरवू त्या वेळी सर्वांनी हो म्हणत ग्राम पंचायत सदस्य विलास तायडे त्यांच्या समोर अट मांडली आम्हाला तुम्ही एक अर्ज आणून द्या की त्या ठिकाणावरून गाडी बैल गाडी किव्वा मोठे कोणते वाहन गेले व कमान गेट ला धक्का लागला तर तुम्ही जबाबदार राहणार. विलास तायडे यांनी हो म्हणत आंबेडकरी समाजाच्या सह्या घेऊन ग्राम पंचायत कार्यालय मध्ये अर्ज देऊन ते मान्य केले.
 
हे आंबेडकरी समाजाला एक वेगळं वाटू लागले पहिले विरोध आणि आता कमान गेट जबाबदारी चा अर्ज असा प्रश्न. आंबेडकरी समाजाला पडला आहे नेमकं अस का करत आहे?

तरी आज दिनाक.२८/०७२०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमान गेट चे उद्घाटन ठेवण्यात आले तरी ग्रामपंचायत कार्यालय हंबर्डी ग्रामसेवक सरपंच सदस्य यांना विलास तायडे यांच्या सांगण्या प्रमाणे की उद्या दिनांक २८/०७/२०२३.रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर कमान गेट चे उद्घाटन आहे सर्व ग्राम पंचायत सरपंच सदस्य हजर राहावे .
असे शिपाई राजू तडवी यांना सूचना देण्यास सांगितले व ग्रामपंचायत कार्यालय हंबर्डी येथील शिपाई राजू तडवी यांनी दिनाक.२७/०७/२०२३ रोजी एक दिवस अगोदर घरी जाऊन सांगितले व ग्रामपंचायत सदस्य विलास तायडे यांनी फोन करून सुद्धा सांगितले डॉ बाबासाहेब आंबेडकर कमान गेट चे उद्घाटन आहे तरी उद्घाटन वेळी हजर राहावे असे सांगून सुद्धा डॉ बाबासाहेब कमान गेट चे उद्घाटन वेळी त्यांनी दांडी मारली आहे.

उद्घाटन वेळी ग्राम पंचायत सदस्य विलास तायडे,यामिनी नेहेते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
विलास तायडे, यामिनी नेहेते, शिपाई राजू तडवी,हेमंत नेहते,निळे निशाण सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष इकबाल तडवी, हंबर्डी निळे निशाण शाखा अध्यक्ष जितेंद्र तायडे, विकास तायडे,अभय मेढे,नितीन मेढे, राहूल ठाकरे,चंद्रकांत तायडे,शरद तायडे, कैलास तायडे, अजय तायडे, विशाल तायडे ,शुभम तायडे, माजी ग्राम पंचायत सदस्य बाली मेढे,मीना तायडे, वैशाली मेढे, विमल तायडे,रत्ना कोळी,आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments