हंबर्डी ग्राम पंचायत कार्यालय ची कंपाऊंड भिंत जिर्ण झाल्याने होऊ शकतो मोठा अनर्थ ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष

हंबर्डी ग्राम पंचायत कार्यालय ची कंपाऊंड भिंत जिर्ण झाल्याने होऊ शकतो मोठा अनर्थ.

यावल तालुक्यातील हंबर्डी ग्रामपंचायत कार्यालय ची कंपाऊंड असलेली भिंत पडण्याच्या मार्गावर असून मात्र ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष दुरुस्ती न  केल्यास होऊ शकतो मोठा अनर्थ  
 हंबर्डी येथे ग्रामपंचायत ची कंपाऊंड भिंत ही अनेक वर्षा पासुन जिर्ण झाल्याने त्या भिंती खाली कोणाच्या दाबण्याची वाट ग्रामपंचायत बघत आहे का ?
असा प्रश्न त्या ग्रामपंचायत कंपाऊंड च्या भिंती जवळून ये जा करणाऱ्यांना पडला आहे.
त्या भिंत जवळून जिल्हा परिषद मराठी शाळेचे लहान मूल मुली व बौद्ध वाड्यातील नागरिक ये जा करीत असता.
 ग्रामपंचायतीचे मात्र त्या कडे दुर्लभ आहे. 
त्या भिंतीचे काम केव्हा करणार व का करत नाही असा प्रश्न त्या भिंती जवळून ये जा करणारे जिल्हा परिषद शाळेचे  लहान मुलामुलीच्या पालकांना व बौद्ध वाड्यातील नागरिकांना  पडला आहे   जर त्या भिंती खाली कोणी दाबले तर त्याला जबाबदार कोण राहील त्या ठिकाणी मोठा अनर्थ होऊ शकतो. तसेच हंबर्डी ग्रामपंचायत ने त्या कडे लवकरात लवकर लक्ष देऊन  त्या कडे दुर्लक्ष न करता त्या कडे लक्ष द्यावे
 असे  त्या भिंती जवळून ये जा करणारे बोलले जात आहे.

0/Post a Comment/Comments