रावेरच्या 'नागझिरी'ला पुन्हा पूर; शहराचा काही भागाशी संपर्क तुटला

रावेर;शहर परिसरात आणि सातपुड्याच्या अंतर्गत भागात गुरुवारी (ता. १३) सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या मध्यातून जाणाऱ्या नागझिरी नाल्याला पुन्हा एकदा मोठा पूर आला असून, वेगवेगळ्या तीन पुलांवरून पाणी वाहत आहे.

यामुळे शहराचा काही भागांशी थेट संपर्क तुटला आहे. 

जुना सावदा रस्त्यावरील पुलावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे तर पंचशील चौकाजवळील पुलावर आणि संभाजीनगर पुलावर देखील पाणी वाहत आहे. पाच जुलैला याच नाल्यात माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील हे मोटरसायकलसह वाहून गेले होते.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या तीनही पुलांवरची वाहतूक थांबवली असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार बी. ए. कापसे आणि पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले आहे. हा पूर पाहण्यासाठी सावदा रस्त्यावरील पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


0/Post a Comment/Comments