तर अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून मृत महिला जळगाव जिल्ह्यातील आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे.
आज पहाटे 6.30 ते 6.45 वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी देवीचं दर्शन करून भाविक येत असताना बस दरीत कोसळली. शार्प टर्नवर घाटातील गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला.
या अपघातात एकूण २१ प्रवाशी जखमी असून त्यात जळगाव जिल्ह्यातील १५ प्रवाशांचा समावेश असून त्यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा