याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील मोहराळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला असून पुतळ्याच्या बाजूला दोन सीसीटिव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आलेले आहेत.मात्र काल रात्री कुणी तरी डबे फेकल्याने शॉर्ट सर्कीट होऊन लाईट गेलेली होती ती आज दि.११ जुलै मंगळवार रोजी सायंकाळी आली.आज दिवसभर पाऊस असल्याने कुणाचे पुतळ्याकडे लक्ष गेले नाही.दरम्यान सायंकाळी अनिल केशव अडकमोल हे पुतळ्याजवळचे सीसीटिव्ही कॅमेरे सुरू आहे की नाही ? हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना कुणीतरी अज्ञात समाजकंटकाने पुतळ्याच्या दिशेने दोन दगड भिरकावल्याचे दिसून आले यामुळे पुतळ्याला दोन ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून आले.ही माहिती मिळताच समाजबांधवांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला.सदरील माहिती मिळताच पोलीस कर्मचारी मोहराळा येथे दाखल झाले तर समाजबांधवांनी यावल पोलीस स्थानकात धडक देऊन या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली.या संदर्भात यावल पोलीस स्थानकात अनिल केशव अडकमोल ( वय ५२) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या गावातील वातावरण नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.यावेळी डीवायएसपी कुणाल सोनवणे व पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर यांनी मोहराळा येथे भेट देऊन शांततेचे आवाहन केले आहे.आज सकाळी निळे निशान या सामाजीक संघटनेचे आनंद बाविस्कर यांनी मोहराळा गावाला भेट दिली व सर्व समाज बांधवांना कोणताही कायद्या हातात न घेता शांततेच्या मार्गाने न्याय मिळवण्याबद्दल मार्गदर्शन व सुचना दिल्या.यावेळी मोहराळा ग्रामपंचायतच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मोठया संख्येत समाजबांधव उपस्थित होते.दरम्यान आनंद बाविस्कर यांच्या सोबत निळे निशान संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास तायडे,युवकचे सतिष अडकमोल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोहराळा येथे अज्ञात व्यक्तीकडून पुतळा विटंबणा प्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल
यावल तालुक्यातील मोहराळा येथे महापुरूष यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र आहे.याबाबत गावात कुठे अनुचित प्रकार होऊ नये याकरिता यावल पोलिसांच्या वतीने गावातील बसस्टॅन्ड चौकात पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा