त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले आहेत. आता नेमका न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागच्या वर्षभरापासून शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या. परंतु अद्याप त्यावर कसलाही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेला लाभ घेता येत नाही. मागच्या वर्षभरात काहीचं न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गावात तिरडी मोर्चा काढला होता.
शासनाच्या विरोधात मोर्चा
मागच्या वर्षभरापासून शेलोडी येथील शेतकऱ्यांनी अनेकवेळा प्रशासन शासनाकडे चूक दुरुस्तीसाठी निवेदन सादर केले. परंतु त्याचा अद्याप कसलाही फायदा झालेला नाही. त्यामुळे शेलोडीतील शेतकऱ्यांची जशी अडचण झाली आहे. तसा इतरही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही. या घटनेचा निषेध म्हणून काँग्रेसचे नेते राम डहाके यांच्या नेतृत्वात शेलोडी येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा