अन्नत्याग आंदोलन शाळेची फी बाकी असल्याने खाजगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप पालक करीत आहेत

अन्न त्याग आंदोलन 

जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह पालक अन्नत्याग आंदोलन करत असून कोरोना काळातील शाळेची फी बाकी असल्याने खाजगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप पालक करीत आहेत . त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी फी न भरल्याने ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक यांनी मुलांना केबिनमध्ये बोलून त्यांना परीक्षे काळात मुलांनी लिहिलेले पेपर त्यांच्यासमोर फाडून त्यांना परीक्षेला देखील बसू दिले नाही असा आरोप पालकांनी यावेळी केला आहे . जोपर्यंत तुम्ही फी भरत नाही तोपर्यंत तुम्ही शाळेत देखील यायचं नाही असेही सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या तरी या खाजगी शिक्षण संस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात आज पालक वर्ग रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे .

0/Post a Comment/Comments