ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावाजवळ आज शुक्रवारी घडली. या अपघात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
मुक्ताईनगर आगाराची एमएच २० बीएल-१७७० या क्रमांकाची बस आज जळगाव येथून निघून काटेलधामकडे येत होती. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावाजवळ असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील ९ प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली आहे.
बसमधील जखमींचे नाव :
सुनील झांबरे ( २२, रा. आळंद ); समाधान उखर्डु तायडे ( ६९, रा. मानेगाव ); कमल गोविंदा पवार ( ५९, रा. वढोदा ); जानकोर त्र्यंबक महाले ( ७५, रा. वढोदा); नलीनी भास्कर न्हावी ( ७०, रा. वढोदा); अनुराधा पाटील ( ३५, मेळसांगवे); कस्तुराबाई भोलणकर ( ७०, रा. शिरसोली); सपना विनोद पाटील ( २७, रा. जामनेर); सार्थक विनोद पाटील (२, रा. जामनेर) यांचा समावेश आहे.
टिप्पणी पोस्ट करा