दि .०९ जून २०२३ शुक्रवारी रोजी यावल जि . जळगाव येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने अनु .जाती / जमातीच्या विविध समस्या मार्गी लावण्याकरिता संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली , जळगाव जिल्हा प्रमुख सतिष जी वाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली यावल टी पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलना दरम्यान संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगीतले कि यावल ग्रामिण पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांनी यावल तालुक्यातील बोरखेडा शिवारात आदिवासी समाजा करिता जलजिवन मिशन अंतर्गत ट्युबेल च्या मंजुरीच्या मुळ कागद पत्राची चौकशी करण्यात यावीतसेच ट्युबेलचे शुरू असलेले काम बंद का करण्यात आले याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी तसेच धुळेपाडा या गावामध्ये ऑफ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी आंदोलन हे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिष वाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले दोन तास यावल शहरातिल भुसावळ चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली
तेव्हा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनि संघटनेच्च सर्व मागण्या मान्य करून तात्काळ धुळेपाडा गांवात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलन यशस्वीते करिता जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , यावल तालुका युवक अध्यक्ष सतिष अडकमोल , यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , चोपडा तालुका महिला मंच अध्यक्षा अनिताताई बाविस्कर , यावल तालुका युवासेना अध्यक्ष तसलीम पठाण , राहुल भिलाला , अमोल तायडे , मिलिंद सोनवणे , मनिष भिलाला , दिपक मेढे यांनी परिश्रम घेतले आंदोलनास शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा