ता.यावल ;राखीव निवडून आलेल्या सदस्य पद जाणार

यावल तालुक्यातील मागील झालेल्या सन २०२१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या राखीव जागा वर विविध पदांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे अपात्र होणार . या संदर्भात मिळालेले माहिती अशी की . यावल तालुक्यातील सन २०२१ च्या कालावधीत पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पंचवार्षिक निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले तालुक्यातील सुमारे ६२ ग्रामपंचायती सदस्यांना आपले पद गमावे लागणार असल्याची माहिती समोर आली असून दरम्यान निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी च्या राखीव असलेल्या जागेवर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांना आपले जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र दिनांक १७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करण्याचे होते . दरम्यान यावल तालुक्यातील आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते जुम्मा तडवी यांनी दिनांक २१ नोहेबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवडणुकी झाल्यानंतर मुदतीच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी तक्रार निवेदनाद्वारे केली होती . जिल्हाधिकारी यांनी दखल घेत यावंल तालुक्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून राखीव जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांची यादी मागविण्यात आली असून यावल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राखीव जागेवर विजय झालेले सुमारे ६२ ग्रामपंचायत सदस्य हे आपात्रहोणार असल्याचे संकेत मिळाले आहे . दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही सर्व अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्र ते संदर्भात त्वरित निर्णय न घे झाल्यास आदिवासी चळवळीच्या विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे .

0/Post a Comment/Comments