पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
नेमकी काय आहे घटना?
भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात अतिक्रमण करण्यात आलेले असून हे अतिक्रमण काढण्याबाबत तक्रारदार भूषण नामदेव पाटील, स्वप्निल प्रल्हाद पाटील, चेतन रवींद्र पाटील आणि जीवन प्रभाकर चव्हाण (सर्व रा. कजगाव ता. भडगाव) यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, भडगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार निवेदन तक्रारी व अर्ज केलेले आहे.
याबाबत यापूर्वी या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी देखील खोटे आश्वासने देऊन जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने आज मंगळवार दुपारी १ वाजता जळगाव जिल्हा परिषद कार्यालयासमोर तक्रारदार भूषण नामदेव पाटील याने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. तरूणांना ताब्यात घेतले आहे.
टिप्पणी पोस्ट करा