जळगाव:शहरातील समतानगरात शनिवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावरून तणाव निर्माण झाला होता . आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते . सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीच्या मुलाला पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या घटनेत अटक केल्याचा राग आल्याने त्याने थेट पोलिसांनाच ' तुम्हाला कामाला लावतो ' अशी धमकी देऊन ही घटना घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे . आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले .
समतानगरात शनिवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या पुतळ्यासमोर राहणारे इमरान कुरेशी ( वय ३२ ) हे नमाज पठण करून घरी परत येत असताना त्यांच्या लक्षात आले की , कुणीतरी पुतळ्याची विटंबना केली आहे . त्यांनी तातडीने शेजारी राहणारे सनी अडकमोल व सचिन अडकमोल या दोन्ही भावांना उठवून ही माहिती दिली . त्यांनी रामानंदनगर पोलिसांना त्याची माहिती कळवली . त्यानंतर जमाव गोळा झाला . तणावाची त्याची माहिती कळवली . त्यानंतर जमाव गोळा झाला . तणावाची स्थिती वाढत असताना समाजातील ज्येष्ठांनी पुतळ्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुष्पहार अर्पण केले . तातडीने दंगा नियंत्रण पथक , रामानंदनगर पोलिस ठाण्याचे डीबी पथक व पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील , पोलिस उपअधीक्षक संदीप गावित हे घटनास्थळी पोहोचले . त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले ; परंतु तणाव स्थिती कायम होती . महिलांनी दोषींवर कारवाई करण्यासाठी आक्रमक होऊन धम्मध्वज घेऊन पायी मोर्चा काढत महाबळचा रस्ता धरला . बघता बघता दीडशे ते दोनशे महिला त्यात सहभागी झाल्या . सुरुवातीला या मोर्चाला बाहेती शाळेजवळ पोलिसांनी थांबवून त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांना माघारी जाण्यास सांगितले ; परंतु जमाव ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हता . पोलिसांना दूर साख्न महिला पुढे निघाल्या . पुन्हा शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर मोर्चेकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला . तो निष्फळ झाला .
अखेर काव्यरत्नावली चौकात मोर्चा पोहोचण्याच्या अगोदर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली . या ठिकाणी पोलिस वाहन आडवे लावून त्यापुढे महिला पोलिसांनी रस्ता अडवून मोर्चेकरी महिलांना रोखले . या ठिकाणी डीवायएसपी व रामानंदनगर ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांनी
आरोपीला ताब्यात घेतले असून , त्याचा फोटो मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या महिलांना दाखवला ; परंतु त्यानंतरही मोर्चेकरी महिलांचे समाधान झाले नाही . तोपर्यंत एलसीबीचे निरीक्षक किसन जनपाटील , अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलिस अधीक्षक एम . राजकुमार हे घटनास्थळी दाखल झाले होते . पोलिसांच्या वाहनावरील ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला जात होता ; परंतु त्यालाही प्रतिसाद मिळत नव्हता . त्याचबरोबर आंबेडकरी समाजातील नेते अनिल अडकमोल , मुकुंद सपकाळे , सचिन अडकमोल यांच्या माध्यमातून मोर्चात सहभागी महिलांची समजूत काढली गेली . अखेर पोलिस अधीक्षक एम . राजकुमार यांनी हो समजूत काढली गेली . अखेर पोलिस अधीक्षक एम . राजकुमार यांनी ही निंदनीय कृती करणाऱ्या आरोपीच्या कृत्यामुळे तुम्ही तुमच्या तरुण मुलांवर गुन्हे दाखल करवून घेऊ इच्छिता का ? असा सवाल केला . तसेच मोर्चातील चार - पाच जणांनी पुढे येऊन फिर्याद द्यावी . अधिकाधिक कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले . तसेच आरोपीचा फोटो दाखवला . मोर्चाां विसर्जित करून माघारी जाण्याचे आवाहन केल्यानंतर महिला माघारी फिरल्या .
टिप्पणी पोस्ट करा