जलजिवन मिशन अंतर्गत आदिवासी समाजासाठी मंजूर पाण्याची ट्युबवेलच्या कामाचे तीन तेरा यावल तालुक्यातील पाणीपुरवठा विभागाचा मनमानी कारभार. येत्या २४तासात पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा ०९/०६/२०२३रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल निळे निशाण सामाजिक संघटनेचा इशारा

जलजिवन मिशन अंतर्गत आदिवासी समाजासाठी मंजूर पाण्याची ट्युबवेलच्या कामाचे तीन तेरा यावल तालुक्यातील पाणीपुरवठा विभागाचा मनमानी कारभार 
     यावल तालुक्यातील बोरखेडा येथे जलजिवन मिशन अंतर्गत आदिवासी समाजासाठी मंजूर झालेली ट्युबवेल सांगवी बु ॥ येथे करण्यात येत होती परंतू ग्राम पंचायत व पाणीपुरवठा विभाग यांच्या अनागोंदी कारभारामुळे सुरु असलेल्या ट्युबवेलचे काम तात्काळ बंद करून आपण केलेल्या मनमानी कामामुळे झालेल्या चुकीवर पडदा टाकून ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभाग यांनी पळ काढून आदिवासी समाजाला वंचित ठेवून मानुसकिला काळीमा फासणारे काम ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाने केलेले आहे .तेव्हा आदिवासी समाजाने निळे निशाण सामाजिक संघटने कडे धाव घेतली तेव्हा तात्काळ संघटनेच्या पदाधिकार्यानी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यावल पंचायत समिती कार्यालय गाठले व सवीस्तर माहीती घेऊन विचारणा केली असता अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली .
     त्याप्रसंगी संघटनेचे जिल्हा प्रमुख सतिष जी वाढे यांची परवानगी घेऊन आदिवासी समाजा करिता येत्या २४ तासात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा दि .०९ जून २०२३ शुक्रवार रोजी यावल येथिल भुसावळ चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तालुका अध्यक्ष विलास तायडे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले .
निवेदन देतांना संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे . तालुका अध्यक्ष विलास तायडे . युवक तालुका अध्यक्ष सतिष अडकमोल . महिला अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे . तालुका उपाध्यक्ष अनिल इंधाटे व आदिवासी समाज बांधव 

0/Post a Comment/Comments