फैजपूर; प्रांताकर्यालयावर महाराष्ट्रातील वाढत्या जातीय हिंसाचाराच्या घटनामधील आरोपींना कठोर शासन होणेबाबत वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

(किरण तायडे, प्रतीनिधी न्हावी)
 प्रांताकर्यालयावर महाराष्ट्रातील वाढत्या जातीय हिंसाचाराच्या घटनामधील आरोपींना कठोर शासन होणेबाबत  वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मोर्चा चा रुट डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष  चौक ,छत्री चौक ते प्रांतकार्यालय असा काढण्यात आला.
महाराष्ट्रातील वाढत्या जातीय हिंसाचाराच्या घटनामधील आरोपींना कठोर शासन होणेबाबत . 
शिव - फुले - शाहू - आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वाढत्या जातीय हिंसाचाराच्या घटना व त्यात निष्पाप लोकांचे बळी जाणे हे चिताजनक आहे . पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात वाढता जातीय हिंसाचार हा केवळ एका जातीपुरत मर्यादित नसून त्याचे बळी पडणारे पिडीत व मयत समाजबांधव हे समाजातल्या विविध स्तरातून येतात . त्यातील बहुतांश वर्ग हा सडक्वा जातीयवादी मानसिकतेचा नाहक बळी ठरत आहे . याला आवर घालण्यासाठी आरोपीवर कठोर कारवाई व कायद्यांचे कडक पालन होणे आवश्यक आहे . नाहीतर हा हैदोस माजुन निरपराध व्यक्तींचा बळी घेत राहील . खालील मागण्यांसहीत आम्ही जनमोर्चाद्वारे शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी फैजपूर यांच्या माध्यमातून आपणास गुरुवार दिनांक १५ जुन २०२३ गुरुवार रोजी वंचित बहुजन आघाडी , समविचारी - आंबेडकरी संघटना व समाजबांधवाच्या माध्यमातून खालील मागण्या करीत आहोत . 

१ ) नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली ह्या गावामध्ये विश्वभूषण डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेऊन जातीयवादी गावगुंडा कडून अक्षय भालेराव ह्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे . अक्षयच्या आई व भावाला ही गंभीर मारहाण करण्यात आली आहे . पोलिसांनी कलम 302 , 307 अॅट्रॉसिटी अॅक्ट सह गुन्हे दाखल केले आहेत . मात्र त्यामध्ये कलम 120 अ आणि ब लावण्यात आलेले नाही . ते लावण्यात यावे . पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपी संख्या केवळ 9 दर्शविली आहे . ह्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग असून आरोपींना राजकीय अभय दिला जात असल्याचे बोलले जात आहे . अद्यापही गुन्हा दाखल केलेल्या सर्व आरोपींना पकडयात पोलिसांना यश आले नाही . आरोपींना अनेकांचे छुपे पाठबळ आहे . सबब हत्याकांड आधी आणि हत्याकांड नंतर हे नऊ आरोपी ज्या कुणाच्या संपर्कात होते त्याचा कॉल डेटा ( सिडिआर ) काढून त्या सर्वांची चौकशी करुन पाठबळ देणारे आणि हत्याकांड घडवून आणणारे मास्टर माईंड व सहकार्य करणारे ह्यांच्यासह आरापी करण्यात यावे .२ ) मुंबई येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील तरुणीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली . याचा विशेष पोलीस पथकाचे माध्यामतून तपास करण्यात यावा . व अपराध्यामा कठोर शासन व्हावे . 

३ ) लातुर मधील रेणापूर येथील मातंग समाजातील गिरीधर तपघाले अवैध सावकारीचा बळी ठरला असून , अवैध सावकारोच्या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्यात येऊन . त्याच्या कुटुंबास आर्थिक सहकार्य मिळावे . व अपराधी सावकारावर तसेच सहभागी अपराध्यांवर काठोर कारवाई करत आजन्म कारावासाची शिक्षा करण्यात यावी.

नांदेड जिल्ह्यातील घटनेमुळे महाराष्ट्रातील जातीय गुंड वृत्तीच्या लोकांची वाढती हिम्मत व जातीयवाद वाढत आहे . त्यात ह्या हत्याकांड आणि इतरांना केलेल्या मारहाणी मुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे . पोलीस व प्रशासनाचे विशेष लक्ष देण्याची गरज असून पीडिताच्या कुटूंबास पोलिस संरक्षक देण्यात यावे तसेच सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी . तसेच अत्याचार बळी आणि त्यांचे कुटूंबातील व्यक्ती , साक्षीदार ह्यांची सुरक्षा , त्यांना नुकसान भरपाई , प्रवास भत्ता , दैनिक भत्ता , निर्वाह खर्च आणि परिवहन सुविधा उपलब्ध करुन देण्यात घ्यावी . अशी मागणी केली आहे . 
वाळा पवार मा जिल्हा जळगाव पूर्व वंचित बहुजन युवा आघाडी ,भगवान मेधे तालुकाध्यक्ष यावल वंचित बहूजन आघाडी ,विनोद सोनावणे जिल्हाध्यक्ष जळगाव पूर्व वंचित बहुजन आघाडी ,बाळु शिरतुरे तालुकाध्यक्ष रावेर वंचित बहुजन आघाडी उपस्थित नागरिक व संघटनाचे पदाधिकारी ,शामिभा पाटील महा . प्रदेश कार्यकारिणी सदस्य वंचित बहुजन युवा आघाडी ,अनोमदर्शी तायडे तालुकाध्यक्ष रावेर भारतीय बौध्द महासभा व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments