विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेले जलजीवन मिशनमधील जलवाहिनीचे काम ग्रामस्थांनी बंद पाडल्यानंतर ठेकेदाराने आणून ठेवलेले पीव्हीसी पाइप आता काळे पडले आहेत . काम सुरु होण्याआधीच पाइपांचा निकृष्टपणा उघड झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला .
ममुराबाद येथे ३५ वर्षांपेक्षा जास्त जुनी झालेली पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने जलजीवन मिशनमधून तापी नदीवरील विहीर तसेच जॅकवेल , जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची मोठी जलवाहिनी , ममुराबाद गावातील पाणी वितरण व्यवस्थेचे नुतनीकरण करण्यासाठी १२ कोटी ९ ४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . पहिल्या टप्यात तापी नदीवरील कामे सुरु केल्यानंतर ठेकेदाराने ममुराबाद गावातील पाणी वितरण व्यवस्थेचे काम हाती घेतले . परंतु त्यास ग्रामस्थांनी विरोध केला . जलवाहिनीच्या गुणवत्तेवर आक्षेप घेतला आहे . तेव्हापासून काम ठप्प आहे . दरम्यान , ठेकेदाराला जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या कार्यारंभ आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे , की पाण्याच्या उद्भवाचे काम पूर्ण झाल्याशिवाय पंपगृह , पंपिंग यंत्रणा , उद्धरण नलिका तसेच वितरण व्यवस्थेचे काम हाती घेऊ नये . प्रत्यक्षात संबंधित ठेकेदाराने पहिल्या
दोन टप्यातील कामांचा ठिकाणा नसताना थेट वितरण व्यवस्थेची तयारी चालवली आहे .
टिप्पणी पोस्ट करा