या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत.
कारचा दरवाजा आणि सीटला छेदून गोळी आरपार गेली. हल्लेखोरांच्या गाडीचा नंबर हरियाणाचा असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान एसएसपी डॉ. विपिन टाडा यांनी याविषयी सांगितलं की, अर्ध्या तासापूर्वी चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर गाडीतून शस्रांसह आलेल्या काही लोकांनी गोळीबार केला. गोळी त्यांना चाटून गेली. त्यांची प्रकृती आता ठिक आहे. सीएचसीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस या हल्ल्याचा पुढील तपास करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा