रावेर.ता.रावेर जि.जळगाव;अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना फाशिच्या शिक्षेची मागणी. निळे निशाण सामाजिक संघटने च्या वतीने जन आक्रोश मोर्चा छोरिया मार्केट ते तहसील कार्यालय रावेर येथे काढण्यात आला.

आज दि. २३ जुन २०२३ शुक्रवार रोजि निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक / अध्यक्ष आंनदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश वाडे यांच्या उपस्थितीत व सुधिर सैंगमिरे रावेर तालुका अध्यक्ष , विजय धनगर रावेर तालुका युवक अध्यक्ष , विद्याताई बाविस्कर रावेर तालुका महिला मंच अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील अक्षय भालेराव या तरुणांच्या मारेकऱ्याना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व रावेर तालुक्यातील विविध समस्या शासनाच्या निदर्शणास येतिल या करिता छोरिया मार्केट रावेर ते तहसिलदार कार्यलय रावेर पर्यत आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

        मोर्चा तहसिलदार कार्यालयावर आल्यावर सर्व प्रथम अक्षय भालेराव यांच्या मारेकर्‍याना फाशिची शिक्षा देण्यात यावी या मागणीसह संघटनेचे संस्थापक / आनंद आनंदभाऊ बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि जिल्ह्यातिल बेघर भुमिहिनाच्या समस्या सोडवून अनुसुचित जाती / जमातिच्या वस्त्या पाड्यावर तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच जलजिवन मिशन अंतर्गत रावेर तालुक्यातील झालेल्या कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी ,भुसावळ औष्णीक विद्युत केंद्रासह जिल्ह्यातिल सर्व कंपनीमध्ये स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा , जिल्ह्यातिल सर्व हायस्कुल कॉलेज जिथे मुली शिक्षण घेतात त्या ठिकाणी मुलिंच्या सुरक्षे करिता गेटच्या बाहेर निर्भया पथक कार्यान्वीत करण्यात यावे व ज्या शैक्षणिक संस्था चालकांनी शिक्षणाचे बाजारीकरण करून विद्यार्थि विद्यार्थिनी यांच्या पालका कडुन फि च्या नावाने मनमानी पैसे वसुल करणाऱ्या संस्था चालकावर कारवाई करण्यात यावी व अश्या अनेक समस्यांच्या करिता आक्रोश मोर्चात संघटनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मोर्चात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या
संदर्भ १) नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात जातीय द्वेषातून अक्षय भालेराव याची निघृण हत्या करण्यात आली त्यामुळे अक्षय भालेराव याच्या कुटुंबावर मोठा अन्याय झालेला आहे तरी अक्षय भालेराव याच्या मारेकर्‍याना फाशीची शिक्षा देऊन अक्षय भालेराव याच्या कुटुंबियांना ५०,००,०००/ ( पन्नास लाखाची ) आर्थिक मदत देण्यात यावी व त्याच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरीतसमाविष्ट करून घ्यावे .
संदर्भ २) जळगाव जिल्हातील सन २०११ पुर्वीचे अतिक्रमित घरे नियमाकुल करावे .
संदर्भ ३) जळगाव जिल्ह्यातील स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना भुसावळ औष्णिक विधुत केंद्रासह इतर कंपन्यामध्ये प्राधान्याने रोजगार देण्यात यावा .
संदर्भ ४) जळगाव जिल्ह्यातील सर्व महाविधालय ज्या ठिकाणी मुली शिक्षण घेत असतील त्या ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महाविधालयाच्या समोर निर्भया पथकाची नेमणूक ५ यावी .
संदर्भ ५) रावेर तालुक्यातील उदळी खु॥ गावाजवळ पाटबंधारे विभागाच्या जागेवर अनेक वर्षापासून असलेल्या २८ घराच्यां पुर्नवसन करिता निधी मंजूर असताना जाणीपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या ग्राम पंचायतीवर कारवाई करून पुर्नवसन प्रक्रियेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी .
संदर्भ ६) जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था ज्यानी शिक्षणाचे बाजारीकरण करून सर्वसामान्य व्यक्तीला वेठीस धरून मनमानी फी आकारली आहे त्या संस्थेनवर कारवाई करण्यात यावी .
संदर्भ ७) रावेर तालुक्यातील विवरा बु ॥ , निभोंरा बु ॥ , निबोंल या गावातील मंजूर असलेल्या प्लॉटी तात्काळ वाटप करण्यात यावे .
आंदोलनात खालिल सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
सतिषजी वाडे - जळगाव जिल्हा प्रमुख
सदाशिव निकम - जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष
सागर बाविस्कर - फैजपुर विभागिय युवासेना अध्यक्ष
विलास तायडे - यावल तालुका अध्यक्ष 
शरद तायडे - रावेर तालुका वाहतूक शाखा अध्यक्ष
अनिताताई बाविस्कर - चोपडा तालुका महिला मंच अध्यक्षा
विदयाताई बाविस्कर - रावेर तालुका महिला मंच अध्यक्षा
लक्ष्मीताई मेढे - यावल तालुका महिला मंच अध्यक्ष
चंद्रकांत सोनवणे , अनिल वाघ , वासुदेव महाजन , अश्विनी अटकाळे , कविता शिंदे

0/Post a Comment/Comments