तरुणांनी असा आणला धान्य घोटाळा उघडकीस
तरुणांनी असा आणला धान्य घोटाळा उघडकीस सरकारकडून गोरगरिबांना शिधापत्रिकेद्वारे रेशन पुरविले जाते . मात्र यातही स्वस्त धान्य दुकानावरील सेल्समन गोर गरिबांच्या धान्यावर डल्ला मारत आहे . अशातच गोद्री येथील तरुणांनी ' मेरा राशन " अॅपच्या माध्यमातून धान्य घोटाळा उघडकीस आणला आहे . या विषयी गोद्री गावात माहिती मिळताच अनेक लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानाकडे धाव घेतल्याने या ठिकाणी बराचवेळ गर्दी झाली होती . गोद्री येथील संदीप समाधान कोळी यांना विकास व सेल्समन कृष्णा चव्हाण यांनी २० किलो धान्य दिले . धान्य घेतल्यानंतर कोळी यांनी कमी धान्य मिळाल्याबाबत शंका आली . सोबत असलेल्या मित्राच्या माध्यमातून मेरा रेशन या मोबाइल अॅपच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाइन पडताळणी केली . त्यावेळी ५० किलो धान्य मंजूर असल्याचे ऑनलाइन यादीत दिसत असले तरी प्रत्यक्षात कोळी यांना फक्त २० किलो धान्य मिळाले होते . कोळी यांनी विविध कार्यकारी सोसायटीच्या रेशन दुकानाजवळ गोंधळ करताच गावातील अनेक तरुण जमले . यापैकी अनेकांनी गेल्या दोन दिवसांत धान्य नेलेले होते . त्यांनीही मेरा रेशन या मोबाइल अॅपवर आपला आधार क्रमांक टाकून मंजूर धान्याबाबत पडताळणी केली . त्यावेळी मिळालेले धान्य व मंजूर धान्य यात सरासरी ५ ते १५ किलोंची तफावत आढळून आली . त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी सेल्समन चव्हाण यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला . तरुणांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देत ' चुकून झाले असेल तर धान्य घेऊन जा " , असे म्हणून सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला . दरम्यान , या विषयी गोद्री गावात माहिती मिळताच अनेक लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानाकडे धाव घेतल्याने या ठिकाणी बराचवेळ गर्दी झाली होती .
टिप्पणी पोस्ट करा