जळगांव येथे दि . १९ जुन २०२३ सोमवार रोजि निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक / अध्यक्ष आंनदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश वाडे यांच्या उपस्थीतित वसंघटनेचे युवक जिल्हाअध्यक्ष अनुपकुमार मनुरे व महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष प्रतिभा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जळगांव जिल्हा अधिकारी कार्यालया समोर जिल्ह्यातिल विविध समस्या शासनाच्या निदर्शणास येतिल या करिता तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले आंदोलनात सर्व प्रथम अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशिची शिक्षा देण्यात यावी या मागणीसह आनंदभाऊ बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि जिल्ह्यातिल बेघर भुमिहिनाच्या समस्या सोडवून अनुसुचित जाती / जमातिच्या वस्त्या पाड्यावर तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच जलजिवन मिशन अंतर्गत रावेर यावल तालुक्यातील झालेल्या कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी . तसेच संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष अनुप मनुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि भुसावळ औष्णीक विद्युत केंद्रासह जिल्ह्यातिल सर्व कंपनीमध्ये स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा . तसेच महिला आघाडी जिल्हा प्रमुख यांनि मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिल्ह्यातिल सर्व हायस्कुल कॉलेज जिथे मुली शिक्षण घेतात त्या ठिकाणी मुलिंच्या सुरक्षे करिता गेटच्या बाहेर निर्भया पथक कार्यान्वीत करण्यात यावे व ज्या शैक्षणिक संस्था चालकांनी शिक्षणाचे बाजारीकरण करून विद्यार्थि विद्यार्थिनी यांच्या पालका कडुन फि च्या नावाने मनमानी पैसे वसुल करणाऱ्या संस्था चालकावर कारवाई करण्यात यावी . आंदोलनात संघटनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
संदर्भ १ ) नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात जातीय द्वेषातून अक्षय भालेराव याची निघृण हत्या करण्यात आली त्यामुळे अक्षय भालेराव याच्या कुटुंबावर मोठा अन्याय झालेला आहे तरी अक्षय भालेराव याच्या मारेकऱ्याना फाशीची शिक्षा देऊन अक्षय भालेराव याच्या कुटुंबियांना ५०,००,००० / ( पन्नास लाखाची ) आर्थिक मदत देण्यात यावी व त्याच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरीतसमाविष्ट करून घ्यावे .
संदर्भ २ ) यावल तालुक्यातील धुळे पाडा काळाडोह आणि आसराबारीपाडा या गावाना तात्काळ ग्राम पंचायतीला समाविष्ट करून नमुना नं .८ ला नोंद करण्यात यावी व त्यांना मुलभुत सुविधा पुरविण्यात यावी .
संदर्भ ३ ) जळगाव जिल्हातील सन २०११ पुर्वीचे अतिक्रमित घरे नियमाकुल करावे .
संदर्भ ४ ) यावल तालुक्यातील टेंभी कुरण या ठिकाणी फक्त अनु . जाती / जमातीचे लोक असून त्या गावी रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ता मंजुर असतांना संबंधीत अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे अनु . जाती / जमातीच्या लोकांचे हाल होत आहेत तरी त्या गावी तात्काळ रस्त्याचे काम सुरुवात करून हलगर्जी करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी .
संदर्भ ५ ) जळगाव जिल्ह्यातील स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रासह इतर कंपन्यामध्ये प्राधान्याने रोजगार देण्यात यावा .
संदर्भ ६ ) जळगाव जिल्ह्यातील सर्व महाविधालय ज्या ठिकाणी मुली शिक्षण घेत असतील त्या ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महाविधालयाच्या समोर निर्भया पथकाची नेमणूक करण्यात यावी .
संदर्भ ७ ) रावेर तालुक्यातील उदळी बु || गावाजवळ पाटबंधारे विभागाच्या जागेवर अनेक वर्षापासून असलेल्या २८ घराच्यां पुर्नवसन करिता निधी मंजूर असताना जाणीपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या ग्राम पंचायतीवर कारवाई करून पुर्नवसन प्रक्रियेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी .
संदर्भ ८ ) यावल / रावेर तालुक्यातील सर्व आदिवासी पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी तसेच यावल तालुक्यातील बोरखेडा बु | शिवारात जल जिवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या ट्युबेलच्या कामात गैरप्रकार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी .
संदर्भ ९ ) जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था ज्यानी शिक्षणाचे बाजारीकरण करून सर्वसामान्य व्यक्तीला वेठीस धरून मनमानी फी आकारली आहे त्या संस्थेनवर कारवाई करण्यात यावी .
संदर्भ १० ) रावेर तालुक्यातील विवरा बु || निभोंरा , निबोंल या गावातील मंजूर असलेल्या प्लॉटी तात्काळ वाटप करण्यात यावे .
आंदोलनात खालिल सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सतिषजी वाडे - जळगाव जिल्हा प्रमुख ,अनुपकुमार मनुरे जळगाव जिल्हा युवक प्रमुख, प्रतिभाताई भालेराव - जळगाव जिल्हा महिला मंच प्रमुख, अशोक तायडे - जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, सदाशिव निकम जळगाव जिल्हा कार्यध्यक्ष ,आकाश सपकाळे - भुसावळ विभागिय युवक अध्यक्ष, सागर बाविस्कर - फैजपुर विभागिय युवासेना अध्यक्ष, विलास तायडे - यावल तालुका अध्यक्ष ,सुधिर सैंगमिरे - रावेर तालुका अध्यक्ष ,संतोष सुरवाडे - भुसावळ तालुका अध्यक्ष ,प्रविण वाघ- बोदवड तालुका अध्यक्ष, भैय्या बागवान - पाचोरा तालुका अध्यक्षा, सतिष अडकमोल - यावल तालुका युवक अध्यक्ष ,अनिताताई बाविस्कर - चोपडा तालुका महिला मंच अध्यक्ष उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा