निळे निशाण सामाजिक संघटना यावल तालुक्याच्या वतिने गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले की दि .०६ जून २०२३ रोजी शिवराज्यभिषेक सोहळा २०२१ च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला परंतु काही देशद्रोही मानसिकत्याच्या लोकांनी किनगाव ग्रामपंचायतने राष्ट्र ध्वजा करिता जी जागा निर्धारित केली आहे त्याच स्तंभावर काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी राष्ट्र ध्वजा करिता निर्धारीत केलेल्या जागेवर भगवा झेंडा लावण्यात आला हे कृत्य करताना किनगाव गावाचे सरपंच , उपसरपंच यांच्यासोबत शासनाचे तलाठी - ग्रामसेवक ह्यांच्या समोर हा प्रकार घडला तरी सुद्धा यांनी न थांबवता त्या राष्ट्रद्रोही प्रवृत्तीला साथ दिली .
निवेदनात संघटनेने नमुद केले की आम्हाला भगवा , निळा , हिरवा रंगाचा द्वेष नाही पण राष्ट्र ध्वजाची जागा कोणत्याच रंगाचा झेंडा घेऊ शकत नाही . आपला देश हा अनेक जाती धर्मानी नटलेला आहे पण सर्वांच्या मनात राष्ट्र ध्वजाची जागा ही एकच आहे आणि त्या जागेवर तिरंग्याच्या ऐवजी दुसऱ्याच रंगाचा ध्वज लावण्यात आला म्हणजे जाणिवपुर्वक समाज्यात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून राष्ट्र ध्वजाचा ही अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून जवाबदार असणाऱ्या शासनाचे कर्मचारी व सरपंच , उपसरपंच यांना पदमुक्त करण्यात यावे .
असे निवेदन जळगाव जिल्हा प्रमुख सतिष जी वाडे यांच्या परवानगी ने देण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , युवक तालुका अध्यक्ष सतिष अडकमोल , महिला मंच तालुका अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , युवासेना तालुका अध्यक्ष तसिल पठाण , तालुका उपाध्यक्ष अनिल इंधाटे , राहुल भिलाला , दिपक मेढे , मिलिंद सोनवणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा